24 November 2020

News Flash

अभिनेता इमरान खानच्या पत्नीची लग्न आणि घटस्फोटावर पोस्ट, म्हणाली..

तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही कारणांमुळे ते विभक्त होण्याचा निर्णय घेत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. घटस्फोट टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु होते. आता अवंतिकाने सोशल मीडियावर लग्न आणि घटस्फोटाशी संबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

अवंतिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही कठिण आहे असे म्हटले. तसेच आपल्या जीवनात कोणत्या कठिण गोष्टींना स्थान द्यायचे हे आपल्यावर आहे या आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

‘लग्न करणे कठिण असते, घटस्फोट घेणे कठिण असते, वजन कमी करणे कठिण असते, लोकांशी बोलणेही कठिण असते. आयुष्यात कठिण गोष्टी या असतातच. पण आपण ठरवू शकतो की आपल्या आयुष्यात कोणत्या कठिण गोष्टींनी स्थान द्यायचे आहे’ या आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

Serious truth bomb via @devonbroughsa #chooseyourhard

A post shared by Avantika Malik (@avantikamalik18) on

सध्या अवंतिकाची ही पोस्ट चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. इम्रान आणि अवंतिका यांची प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. २०११ साली इम्रान आणि अवंतिकाचा विवाह झाला होता. त्या दोघांना एक मुलगी आहे. जून २०१९मध्ये अवंतिका इम्रानच्या घरातून बाहेर पडली. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:46 pm

Web Title: imran khan wife avantika shares post on marriage and divorce avb 95
Next Stories
1 ‘मला इथे रहायचं नाही’; भाईजानमुळे रुबिना दिलैक सोडणार बिग बॉस?
2 नेहा कक्करचा रोका झाला, समोर आला व्हिडीओ
3 मुक्या प्राण्यांची ‘ती’ झाली अन्नपूर्णा; तेजस्विनीचा नवरात्री स्पेशल लूक
Just Now!
X