News Flash

तू तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत दिग्दर्शकावर झालेल्या वर्णभेदावर प्रियांकाने केले वक्तव्य

जाणून घ्या सविस्तर

अमेरिकेत वर्णभेद हा बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. यावर बऱ्याच वेळा वादही झाले आहेत. अलीकडेच ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामिन बहराणी यांना अटलांटामध्ये त्यांच्या वर्णावरुन टीका करण्यात आली होती. त्याचा खुलासा त्यांनी केल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने यावर तिचे मत मांडले आहे.

रामिन यांनी एका मुलाखती या घटने बद्दल सांगितले. “आम्ही अटलांटामध्ये एका ठिकाणी अॅप्लच्या एका टीव्ही जाहिरातीचे चित्रीकरण करत होतो. त्या दिवशी कामात आम्हाला उशिर झाला, म्हणून मला तिथूनच रस्त्यावर झूम कॉलवर एवा डुवर्ने आणि बाफटा आणि अॅकेडमीच्या इतर सदस्यांच्या त्या मुलाखतीत सहभागी व्हावे लागले. मुलाखतीदरम्यान, माझ्या मागे एक गाडी उभी असल्याचे माझ्या लक्षात आले. जेव्हा ड्रायव्हरने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पाहिले (जे दक्षिण आशियाई आहेत) तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, “तुम्हाला सगळ्यांना वाटते की तुम्ही जग चालवता? तुम्ही सगळे जग चालवत नाही तर खराब करत आहात,” त्यावेळी त्या व्यक्तीच्या मित्राने त्याला शांत होण्यास सांगितले आणि त्याने गाडी चालू केली. तेव्हा तो बाहेर आला आणि म्हणाला, “तू तुझ्या देशात परत जा!” असे रामिन यांनी सांगितले.

यात आत प्रियांकाने तिचे मत मांडले आहे. प्रियांकाने रामिन यांची बाजू घेतली आणि म्हणाली, “रामिन सोबत जे झाले त्यानंतर प्रश्न येतो की या देशात कोणाला हक्क आहे आणि कोणाला नाही? हा देश परप्रांतियाच्या बळावर त्यांच्या स्वप्नांवर बांधला गेला आहे. त्यांना अमेरिकेत मिळणारी वागणूक ही अगदी चुकीची आहे. अमेरिकाला यो गोष्टींसाठी ओळखले जातं नाही. अमेरिकेला आम्ही सुरक्षित ठिकाण, स्वतंत्र जीवण म्हणून ओळखतो.”

दरम्यान, प्रियांका ही सतत सामाजिक मुद्यांवर तिचे मत मांडताना दिसते. यापुर्वी तिने ‘अनफिनिश्ड’ या तिच्या पुस्तकात अमेरिकेतील वर्णभेदाच्या घटनांचा उल्लेख केला होता. प्रियांका सध्या पती निक जोनससोबत लंडनमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 5:46 pm

Web Title: in america the white tiger director ramin bahrani faces racism priyanka chopra reacts dcp 98
Next Stories
1 “तू म्हणजे कंगनाचं मेल व्हर्जन”; ट्रोलर्सला अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर!
2 ‘आई आणि अब्बा एकत्र…’, घटस्फोटानंतर सारामुळे एकत्र आले सैफ आणि अमृता
3 प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री ‘वन फोर थ्री’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X