News Flash

Bigg Boss 14: सलमानच्या लग्नाबाबत ज्योतिषाने केली भविष्यवाणी

३ ऑक्टोबर रोजी बिग बॉस १४ शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस १४ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पाहायला मिळाला. तेव्हा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी एक ज्योतिष व्हिडीओ कॉलद्वारे तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांनी सलमानच्या लग्नाविषयी देखील भविष्यवाणी केली.

‘बिग बॉस १४’मध्ये सर्वात पहिले अभिनेता एजाज खान आणि निकी तंबोलीची एण्ट्री झाली. त्यावेळी ज्योतिष जनार्दन यांना सलमानने एजाज आणि निकी यांचे भविष्य विचारले. त्यावर त्यांनी निकी एकदम साधी दिसत असली तरी अतिशय हुशार आहे आणि करिअरमध्ये खूप पुढे जाईल असे म्हटले. तर एजाजला सल्ला देत त्यांनी स्वत:च्या मनाचे ऐकण्याचे सांगितले आणि कोणीही भडकवल्यानंतर कोणतेही पाऊल उचलू नये असे त्यांनी म्हटले.

एजाज आणि निकीचे भविष्य ऐकल्यानंतर सलमानने हसत हसत जनार्दन यांना तुम्ही सहा वर्षांपूर्वी माझे लग्न होणार आहे असे सांगितले होते पण झालेच नाही. ते ऐकून प्रेक्षकांना हसू अनावर झाले. तसेच सलमानने पुढे असा काही उपाय आहे का ज्याने माझे लग्नच होणार नाही असे म्हटले. सलमानचे प्रश्न ऐकल्यावर जनार्दन यांनी, तुझे लग्न होणार होते पण काही कारणास्तव ते नाही झाले असे म्हटले. दरम्यान त्यांनी आता लग्नाचा योग नसल्याचे देखील म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 12:35 pm

Web Title: in bigg boss 14 atrologist talk about salman khan wedding avb 95
Next Stories
1 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लगीनघाई, शुभम-कीर्ती अडकणार विवाहबंधनात
2 माझ्यासाठी आत्महत्या ही हत्येपेक्षा मोठी चिंता- प्रसून जोशी
3 चित्रचाहूल : उत्कंठावर्धक आठवडा..
Just Now!
X