News Flash

‘या’ गोष्टीत अजय देवगण ठरला नंबर वन; सलमान खान आणि साउथ स्टार विजयलाही टाकलं मागे!

अजयने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, तसचं बिग बी अमिताभ बच्चन यांना मागे टाकलंय.

(File Photo/Ajay Devgan/Salman Khan/Vijay)

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण सध्या मुंबईतील त्याच्या नव्या बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. अजयने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील जूहू परिसरात 60 कोटींचा आलिशान बंगला खरेदी केलाय. यानंतर आता अजयने आणखी एक नवा विक्रम केलाय. अजय देवगणने यूट्यूबवरील सर्चमध्ये बॉलिवूडसह अनेक साउथ स्टार्सना मागे टाकलं आहे.

गुगल ट्रेंडच्या नव्या रिपोर्टनुसार अजय देवगण गेल्या १२ महिन्यात यूट्यूबवर सर्वाधिक सर्च केला जाणार सेलिब्रिटी ठरला आहे. म्हणजेच गेल्या वर्ष भरात यूट्यूबवर चाहत्यांनी सर्वात जास्त अजय देवगणच्या नावाच कंटेंट सर्च केलाय. यात अजयने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, तसचं बिग बी अमिताभ बच्चन यांना मागे टाकलंय. एवढचं नाही तर अजयने साउथ सुपरस्टार अल्‍लू अर्जुनपासून थलापति विजयला देखील टक्कर दिलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

हे देखील वाचा:शाहरुख खानच्या लेकीने शेअर केला जिममधील हॉट फोटो, सुहानाचा फोटो पाहून चाहते घायाळ

सलमान खान दुसऱ्या नंबरवर

गुगलच्या या रिपोर्टनुसार संपूर्ण वर्षभरात यूट्यूबवर अनेक सेलिब्रिटींना सर्च केलं जातं. मात्र या सर्वात अजय देवगणने बाजी मारलीय. तर या यादीत दुसऱ्या नंबरवर अभिनेत्रा सलमान खानचं नाव आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या नावामध्ये अल्लू अर्जुनचा समावेश आहे. चौथ्या नंबरवर बिग बी अमिताभ बच्चन तर पाचव्या क्रमांकावर थलापति विजय आहे.

हे देखील वाचा: कॉटन साडी…गॉगल्स आणि शूज; रशियाच्या रस्त्यांवर तापसीचा हटके लूक

येत्या काळात अजय देवगण ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘मैदान’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचसोबतच रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ आणि संजय लीला भंसाळींच्या ‘गंगूबाई काठ‍ियावाड़ी’ या सिनेमातही तो प्रमुख भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 2:11 pm

Web Title: in google tends report ajay devgan is most searched actor on you tube salman khan is second and vijay is fifth kpw 89
Next Stories
1 ‘अग्गबाई सुनबाई’मध्ये वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी आसावरी समोर येणार सोहमचं सत्य!
2 KKK 11 कंटेस्टेंट राहूल वैद्य दिशासोबत नेमकं कधी, कुठे करणार लग्न ? लग्नाचे दिले संकेत
3 नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी
Just Now!
X