सध्या सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ देशातील लोकप्रिय शोमधील एक मानला जातो. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदाने पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासह हजेरी लावली होती. दरम्यान गोविंदाच्या पत्नीला कपिल शर्माने काही प्रश्न विचारले. त्यावर तिने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे.

गोविंदाची मुलगी टीना हिचा ‘मिलो ना तुम’ हा नवा अल्मब येत आहे. या अल्बमचे दिग्दर्शन गजेंद्र वर्माने केले आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी टीना आई-बाबा आणि गजेंद्रसह कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. दरम्यान गोविंदाने पत्नी सुनीतासह तिसऱ्यांदा लग्न केले. त्यावर कपिल शर्माने गोविंदाच्या पत्नीला तिसऱ्यांदा गोविंदासोबत लग्न केल्यावर केसे वाटते असा प्रश्न विचारला.

‘गोविंदाने दोन-चार अफेअर आणखी केले असते तर मला मज्जा आली असती’ असे मजेशीर उत्तर गोविंदाच्या पत्नीने दिले आहे. तिचे हे उत्तर ऐकताच प्रेक्षकांना हसू आवरेनासे झाले होते. त्यावर कपिलने माझ्या पत्नीने देखील हे ऐकावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “तो आला नाही ना?” रणवीरबद्दल बोलताना दीपिका घाबरली

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.