छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नेहमीच शो मध्ये हजेरी लावताना दिसतात. आता या कार्यक्रमात अभिनेत्री जया प्रदा, अभिनेता राज बब्बर, अभिनेता गुरप्रीत गुग्गी, अभिनेत्री इहाना ढिल्लन यांनी हजेरी लावली आहे. कपिलच्या शोमध्ये अनेक कलाकार आपल्या खासगी आयुष्याबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. त्यात जया प्रदा यांनी देखील एक गोष्ट सांगितली आहे.
सोनी टीव्हीने कपिल शर्मा शोच्या आगामी भागाचा प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात जया प्रदा आणि राज बब्बर त्यांच्या काळातल्या अनेक मजेशीर गोष्टी सांगताना दिसतात. तेव्हाच कपिलने जया प्रदा यांना एक प्रश्न विचारला की, चित्रपटाच्या सेटवर सगळ्यात जास्त फ्लर्ट कोणता अभिनेता करायचा? या प्रश्नावर जया प्रदा यांनी लगेच उत्तर न देता राज बब्बर यांना विचारले सांगू का? त्यावर ते सांगा म्हणताच जया प्रदा सांगतात की धर्मेंद्र जी. धर्मेंद्र यांचे नाव ऐकताच तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसू अनावर झाले आहे.
प्रिया वारियरचे नवे गाणे प्रदर्शित, पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
आणखी वाचा- ‘आमच्या मुलीचे फोटो काढू नका’, विराट-अनुष्काने केली विनंती
धर्मेंद्र आणि जया यांची जोडी ८० ते ९०च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय जोडींपैकी एक होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘कयामत’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘गंगा तेरे देश में’ आणि ‘कुंदन’ सारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 10:36 am