News Flash

‘मास्टर’चा रिमेक, सलमान साकारणार विजयची भूमिका?

जाणून घ्या सविस्तर

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ हा जानेवारी महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. करोना काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार आहे. त्यात विजयची भूमिका बॉलिवूडचा भाईजान सलमान खान साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘मास्टर’चा रिमेक हा कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एन्डेमोल शाइन करणार आहेत. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, “मुराद आणि एन्डेमोलच्या टीमने सलमानची गेल्या ३० दिवसांपासून ‘मास्टर’विषयी चर्चा करण्यासाठी अनेकदा भेट घेतली आहे. या चित्रपटाची संकल्पना सलमानला आवडली आहे आणि त्याने या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. तर, ‘मास्टर’ची टीम हिंदीमध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे येण्याची तो वाट पाहत आहे, कारण तामिळ भाषेत असलेल्या या मुळ चित्रपटाचे बॉलिवूडच्या प्रेक्षकांसाठी काही बदल करावे लागणार आहेत.”

” ‘मास्टर’ या चित्रपटात विजयने ज्या प्रमाणे प्रेक्षकांना शेवट पर्यंत धरून ठेवले. तशी भूमिका बॉलिवूडमधील काही मोजकेच अभिनेते करू शकतात आणि सलमान त्या भूमिकेसाठी योग्य असून चित्रपटाच्या टीमची पहिली पसंत आहे,” अशी माहिती ‘कोईमोई’वृत्त वाहिनीला सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सलमान आणि निर्मात्यांमध्ये सुरू असलेली चर्चा ही अगदी सुरूवातीच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर सलमान चित्रपट करण्याचा निर्णय घेईल. ‘मास्टर’ची टीम सध्या मुळ स्किप्टमध्ये बॉलिवूड प्रेक्षकांना आवडतील असे बदल करत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सलमानला या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला मिळू शकते.”

सलमान सध्या ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. जर सलमानने ‘मास्टर’च्या हिंदी रिमेकसाठी होकार दिला तर ‘कभी ईद कभी दिवाली’नंतर या चित्रपटाचे चित्रीकरण करेल. तर या वर्षी ईदला सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 11:19 am

Web Title: in master remake salman will play the vijay s role dcp 98
टॅग : Salman Khan
Next Stories
1 कार्तिकसोबत काम केल्यानंतर अमृता सुभाष म्हणाली; त्याच्यासोबत काम करणं म्हणजे…
2 अक्षय कुमार करोना पॉझिटिव्ह, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
3 विवाहित पुरुषावर प्रेम करणं म्हणजे…मला विचारा; रेखा यांच्या उत्तराने सगळे थक्क
Just Now!
X