News Flash

“…म्हणून मी अजूनही सिंगल आहे”, कंगनाने केला खुलासा

मुलाखतीत कंगनाने केला खुलासा..

छोट्या पडद्यावरील विनोदी आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. कपिल शर्मा या शोचे सुत्रसंचालन करतो. या शो मधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने सिंगल असण्याचे कारण सांगितले आहे.

कपिलच्या शोचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत युट्युब काऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक चाहता कंगनाला ‘तू एवढी सुंदर आहेस तरी तू सिंगल का आहेस?’ असा प्रश्न विचारतो. त्याला उत्तर देत कंगना कपिल आणि नवजोत सिंग सिद्धूकडे पाहूण बोलते, ‘याच पण लग्न झालं आहे आणि त्यांचपण लग्न झालं आहे, सगळ्यांच लग्न झालं आहे.’ तर कंगनाचा चाहता तिथेच थांबत नाही आणि म्हणतो, ‘मी सिंगल आहे.’ चाहत्याचं उत्तर ऐकताच कंगना हसू लागते.

कंगनाचा हा व्हिडीओ खूप जूना आहे. कंगना २०१४ मध्ये ‘क्वीन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा’ शोमध्ये आली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. ‘क्वीन’मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे कंगना घरा घरात पोहोचली. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री लीसा हेडन देखील मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, कंगना आता आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यातील एक म्हणजे ‘थलायवी’. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रदर्शणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘थलायवी’ तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 4:59 pm

Web Title: in the kapil sharma show kangana ranaut revealed why is she single dcp 98
Next Stories
1 झारखंडच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियांका चोप्रा आणि नव्या नंदाने केलं कौतुक
2 एजाजबरोबर लग्न करताना धर्माची अडचण?; पवित्रा पुनिया म्हणते…
3 ‘लोकांकडे खायला अन्न नाही आणि..,’ मालदीवचे फोटो पोस्ट करणाऱ्या कलाकारांना नवाजचा टोला
Just Now!
X