23 November 2020

News Flash

Video: कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदचे अश्रू अनावर, पाहा नेमकं काय झालं

सोनी टीव्हीने नुकताच प्रोमो शेअर केला आहे

करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता हळूहळू सर्व अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. हे सर्व नियम लक्षात घेऊन आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’चे चित्रीकरण सुरु झाले आहे. कपिल शर्मा शोच्या पहिल्याच भागात अभिनेता सोनू सूद हजेरी लावणार असल्याचे समोर आले आहे. पण शोमध्ये असे काही झाले आहे की सोनू सूदला अश्रू अनावर झाले आहेत.

नुकताच सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कपिल शर्मा शोचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी, ‘लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवल्यामुळे सोनू सूद झाला देशातील लोकांसाठी खरा सुपरस्टार. आणि आता तो कपिल शर्मा शोमध्य हजेरी लावणार आहे. १ ऑगस्ट रोजी कपिल शर्माचा नवीन एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीला’ असे म्हटले आहे.

प्रोमोमध्ये अनेक लोकांनी सोनू सूदचे आभार मानले असून त्याला आशिर्वाद दिला आहे. ते पाहून सोनू सूद भावूक होतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. कपिल शर्मा शो मधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच चाहत्यांमध्ये शोच्या आगामी एपिसोडमध्ये सोनू सूदला पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. तसेच या शोमध्ये सोनू सूदने गरजुंना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी कशी मदत केली. या कार्यात कोणते अडथळे आले यावर भाष्य करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:08 pm

Web Title: in the kapil sharma show sonu sood will be the firt guest avb 95
Next Stories
1 ‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड’मध्ये ‘एक होतं पाणी’ला सात नामांकने
2 Video : ‘क्यूँ की तुम मेरी बेटी हो’; देशातील मुलींसाठी विद्या बालनची हृदयस्पर्शी कविता
3 ‘पावर स्टार’ला महानगरपालिकेचा दणका; राम गोपाल वर्मांना ठोठावला दंड
Just Now!
X