News Flash

लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडला नफा; सैफमुळे झाली ४०० कोटींची कमाई

सैफमुळे बॉलिवूडला मिळाला नफा?

सैफ अली खान

२०२० हे वर्ष प्रत्येकाच्या मनावर आणि इतिहासातही करोनाचं वर्ष म्हणून कोरलं जाईल. या वर्षी सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या घटना घडल्या. या काळात अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. परिणामी, कलाविश्वावरही त्याचे पडसाद उमटले. चित्रपटगृह,नाट्यगृह बंद होते. मात्र, या बंदच्या काळातही केवळ अभिनेता सैफ अली खानमुळे बॉलिवूडला तब्बल ४०० कोटींचा नफा मिळाला आहे.

या काळात ओटीटी असो किंवा अन्य माध्यम सैफचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. याच चित्रपटांमुळे कलाविश्वाला नफा मिळाला आहे. २०२० या वर्षाच्या सुरूवातीला सैफचा ‘तानाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्याची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८० कोटींची कमाई केली. त्यानंतर त्याचा ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. हे दोन्ही चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळून एकूण ४०० कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, सैफ अली खान ‘भूत पोलीस’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे सैफच्या या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 4:32 pm

Web Title: in the pandamic bollywood industry earned 400 crores from saif ali khan dcp 98
Next Stories
1 जातीय व्यवस्थेवर अवधूत गुप्ते व्यक्त; पाहा, त्याचं नवं रॅप साँग
2 हा काय डान्स आहे का? ‘नागीन’ डान्सवर थिरकली राखी-राहुलची जोडी
3 ‘एजाजच्या प्रेयसीने मला घरी बोलावलं अन्…’; विकास गुप्ताचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X