28 February 2021

News Flash

महेश बाबूचा हा चित्रपट ठरतोय सुपरहिट; दोन दिवसांत जमवला १०० कोटींचा गल्ला

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात ५३ कोटींची कमाई केली.

महेश बाबू

चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा सातत्याने पाहायला मिळत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत आता बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रादेशिक चित्रपट अग्रस्थानी असल्याचं समोर येत आहे. एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक गाजणारा तेलुगू चित्रपट ठरतोय ‘भारत अने नेनू’ Bharat Ane Nenu. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. मैलाचा दगड ठरणाऱ्या हा चित्रपट कोरटला शिवा यांनी दिग्दर्शित केला आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात ५३ कोटींची कमाई केली. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही महेश बाबूचे असंख्य चाहते असून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत ‘भारत अने नेनू’ पाचव्या स्थानावर आहे. यावरूनच प्रसिद्धीचा अंदाज सहज लावता येऊ शकतो.

वाचा : शिल्पा शिंदेकडून पॉर्न व्हिडिओ शेअर, हिना खानने सुनावले खडेबोल

या चित्रपटाच्या टीझरने विश्वविक्रम केला होता. जगभरात सर्वाधिक ‘लाइक्स’ मिळवणाऱ्या चित्रपटांच्या टीझरच्या यादीत महेश बाबूच्या या चित्रपटाचा टीझर दुसऱ्या क्रमांकावर होता. कोरटला शिवा दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी राजकारणाशी संबंधित आहे. यामध्ये महेश बाबूसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीचीही महत्त्वपूर्ण भूमिक आहे. ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटातून कियाराने बॉ़लिवूडमध्ये पदार्पण केलं. येत्या काही दिवसांत हा चित्रपट काही नवीन विक्रम प्रस्थापित करेल, यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 11:43 am

Web Title: in two days mahesh babu bharat ane nenu mints rs 100 crore
Next Stories
1 शिल्पा शिंदेकडून पॉर्न व्हिडिओ शेअर, हिना खानने सुनावले खडेबोल
2 VIDEO : ‘सात समुंदर पार मैं तेरे..’वर सारा थिरकते तेव्हा..
3 स्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की! #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका
Just Now!
X