News Flash

Video: तैमुरची बहीण म्हणतेय गायत्री मंत्र; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

विकी कौशल, परिणीती चोप्रा, नेहा धुपिया या सेलिब्रिटींनाही इनायाच्या या व्हिडीओची भुरळ पडली आहे.

इनाया नौमी खेमू

सोहा अली खान आणि कुणाल खेमूची मुलगी इनाया नौमी तिचा भाऊ तैमुर अली खानइतकीच प्रसिद्ध आहे. भाऊबीजेच्या दिवशी कुणालने इनायाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओत ती गायत्री मंत्र म्हणताना दिसतेय. इनायाचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कुणालची बहीण औक्षण करताना आधी गायत्री मंत्र म्हणते आणि नंतर इनायाला म्हणायला सांगते. चिमुकली इनाया न चुकता न अडखळता गायत्री मंत्र म्हणते. कुणालने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला तीन दिवसांत सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींनीही इनायाची प्रशंसा केली आहे. परिणीती चोप्रा, विकी कौशल, रणविजयसिंग, नेहा धुपिया, हर्षवर्धन राणे, सुमीत व्यास यांसारख्या कलाकारांनी व्हिडीओवर कमेंट करत इनायाचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर तैमुरचे फोटो व व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण यावेळी इनायाच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

पाहा फोटो : लग्नसोहळ्यासाठी जिजामातेला पारंपरिक दागिन्यांचा साज

कुणालच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो नुकताच ‘लुटकेस’ या चित्रपटात झळकला होता. या कॉमेडी ड्रामामध्ये कुणालसोबतच  गजराज राव, रसिका दुग्गल, रणवीर शौरी आणि विजय राज यांच्या भूमिका होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:54 pm

Web Title: inaaya naumi kemmu chants gayatri mantra netizanans in love watch video ssv 92
Next Stories
1 …म्हणून ऐश्वर्या राय गरोदर असताना मधूर भांडारकर होता नैराश्यात
2 ‘गणेश गायतोंडे’ लवकरच मराठीत
3 ”माझ्या पतीला फोन केला अन् म्हणाला..”; सोना मोहपात्राचे सोनू निगमवर गंभीर आरोप
Just Now!
X