News Flash

अनुराग-तापसीची पुण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी; तीन दिवस चालणार झाडाझडती?

मालमत्तांची झाडाझडती सुरूच; तीन दिवस चालू शकतो तपास

अभिनेत्री तापसी पन्नू व अनुराग कश्यप. (संग्रहित छायाचित्र)

कर चोरी केल्या प्रकरणी सध्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनुराग व तापसीसह फँटम फिल्म प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. बुधवारी (३ मार्च) रात्री उशिरापर्यंत पुण्यात अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त असून, काल दुपारपासून सुरू असलेली मालमत्तांची झाडाझडती अजूनही सुरूच आहे. ‘इंडिया टुडे’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

फँटम फिल्मशी संबंधित सेलिब्रेटींच्या मालमत्तांवर आयकर विभागाने बुधवारी (३ मार्च) छापे टाकले. मुंबई, पुण्यासह एकूण २२ ठिकाणी छापे टाकले. यात फँटम फिल्मसह टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयावरही आयकरने धाड टाकली. काल दुपारपासून आयकरचे पथक या मालमत्तांची आणि कर चोरी प्रकरणाचा तपास करत आहेत.

आयकर विभागाने बुधवारी अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची जवळपास सहा तास चौकशी केली. आयकर विभागाकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारावर अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली. त्यांना झालेला नफा आणि त्यांनी भरलेला आयकर परतावा याच्यात आयकर विभागाला तफावत आढळून असून, पुढील तीन दिवस झाडाझडती सुरूच राहणार असल्याचं ‘इंडिया टुडे’नं आयकर विभागातील सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे.

आयकरच्या पथकांनी बुधवारी अनुराग कश्यप, तापसी पन्नू, फँटमचा फिल्मचा सहसंस्थापक विकास बहल आणि क्वान कंपनीचे मधू मंटेना यांच्या मालमत्तावर छापे टाकले होते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची झाडाझडती अजूनही सुरूच असून, आज अनुराग, तापसीसह मधू मंटेना आणि विकास बहल यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. फँटम फिल्मशी संबंधित २२ मालमत्तांवर आयकरने धाडी टाकल्यानंतर राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले. सरकारविरोधात भूमिका घेतल्यामुळेच अनुराग आणि तापसीवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचं काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 11:07 am

Web Title: income tax department raid taapsee pannu anurag kashyap and madhu mantenas it grilling to continue today bmh 90
Next Stories
1 अन् अभिषेकने खेचत नेलं ऐश्वर्याला, व्हिडीओ व्हायरल
2 हा आहे साराचा ‘विटामिन-सी’डोस, शेअर केले हॉट फोटो
3 कुस्तीच्या आखाड्यात आकाशचा ‘ले पंगा’, पैलवान मित्रांचे मानले आभार
Just Now!
X