26 October 2020

News Flash

बॉलिवूड कलाकरांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

आज देशभरात ७४वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

आज देशभरात ७४वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण घरात बसून एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी अनोख्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ‘करोना व्हायरस विरोधात लढा देणाऱ्या जवानांना माझा सलाम आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या या शुभदिनी शांती, समृद्धीच्या शुभेच्छा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अभिनेता विकी कौशलने देखील पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Happy 74th Independence Day!

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळयांना रोखले आहे. करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 10:02 am

Web Title: independence day 2020 social reaction bollywood celebs avb 95
Next Stories
1 सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकितानं दाखवला आरसा
2 उपचारासाठी विदेशात जाण्यापूर्वी संजूबाबा करणार ‘हे’ काम
3 सुशांतने अंकितासाठी खरेदी केला होता कोट्यवधींचा फ्लॅट; दर महिन्याला भरत होता EMI
Just Now!
X