07 August 2020

News Flash

घराणेशाहीवरुन शाहरुख-करणवर आरोप करणाऱ्या इंदर कुमार यांच्या पत्नीचा सलमानला पाठिंबा

पल्लवीने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. यात काही दिवसापूर्वीच दिवंगत अभिनेता इंदर कुमार यांच्या पत्नीने पल्लवीने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि शाहरुख खानवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यानंतर आता तिने सलमान खानविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे.

करण आणि शाहरुखवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पल्लवीने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत. या कलाविश्वात सलमान खानने माझ्या पतीला काम करण्याची संधी दिली असं ती म्हणाली आहे. त्यामुळे एकीकडे अनेकांनी सलमानला विरोध केला असला,तरीदेखील पल्लवीने त्याला पाठिंबा दिला आहे.

“घराणेशाही ही केवळ बॉलिवूडमध्येच आहे असं नाही,तर ती सर्वच क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी आपला व्यवयास पुढे चालवावा. मग तो मुलगा योग्य असला काय नी नसला काय. आपण सगळेच काय कुटुंबाची आणि मित्र-परिवाराची मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे घराणेशाहीसाठी आपण केवळ बॉलिवूडलाच दोषी ठरवू शकत नाही. कारण ही परिस्थिती आपल्या चहूबाजुला पाहायला मिळते. काही जण सलमान खानला दोषी ठरवत आहेत, मात्र त्यांनी केलेली चांगली काम लोक सहज विसरले”, असं पल्लवी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “सलमान खानने इंदरला अनेक वेळा काम करण्याची संधी दिली. इंदर त्याचा मित्र होता म्हणून नाही, तर सलमानने इदरमधील कामाची क्षमता आणि त्याची मेहनत पाहिली होती. अनेक वेळा इदरने स्वत: हून प्रगती करावी यासाठी सलमानने त्याला मदत करण्यास नकारही दिला. माझ्या मते हीच खरी मैत्री आहे. सलमान कायम एक मोठा भाऊ म्हणून इंदरच्या पाठीमागे उभा होता. इंदरची साथ दिल्यामुळे मनापासून धन्यवाद भाई”.

वाचा : ‘इंदर कुमारसुद्धा झाले होते घराणेशाहीचे शिकार’; पत्नीचे करण जोहर व शाहरुखवर आरोप

वाचा :  ‘सुशांतची आत्महत्या साधी नाही’; शेखर सुमन यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

दरम्यान, पल्लवीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चिली जात आहे. इंदर कुमार हे कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होते .१९९६ साली त्यांनी मासूम चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘वॉन्टेड’, ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र २०१७ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 10:06 am

Web Title: inder kumar wife pallavi kumar says salman khan helps many occasion ssj 93
Next Stories
1 ‘सुशांतची आत्महत्या साधी नाही’; शेखर सुमन यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
2 सुशांत सिंह आत्महत्या: नेटफ्लिक्सच्या आशिष सिंग यांचीही पोलिसांकडून चौकशी
3 ‘त्याच्या जन्मासाठी केला होता नवस, पण…’; सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया
Just Now!
X