भारत हा एक अत्यंत सहिष्णू देश असून, मला आयुष्यभर भारतातच रहायला आवडेल, असे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने म्हटले आहे. काश्मीरची पार्श्वभूमी असलेल्या ‘फितूर’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीच्या कार्यक्रमामध्ये ती बोलत होती.
कतरिना म्हणाली की, असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या चर्चेबद्दल मला पूर्णपणे कल्पना नाही. पण माझ्या दुष्टीने भारत सहिष्णू देश आहे. जेव्हा मी ब्रिटनवरुन भारतात आले तेव्हा मला घरी आल्यासारखे वाटले. इथे जी आत्मियता, आपलेपणा आहे तो अन्यत्र कुठे जाणवली नाही. भारतासाठी माझ्या मनात विशेष स्थान आहे. मला आयुष्यभर इथेच राहायची इच्छा आहे.
बॉलिवुडमधले आघाडीचे नायक आमिर खान, शाहरुख खान यांनी देशातल्या वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर बॉलिवुडमध्ये सहिष्णू-असहिष्णूतेच्या वादाला सुरुवात झाली होती. त्यावर अभिनेते अनुपम खेर, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जाहीरपणे आमिर-शाहरुखच्या विधानाला निषेध केला होता.