‘इंडिया के मस्त कलंदर’ (IMK) हा नवा शो सोनी सब या वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील आगळ्यावेगळ्या प्रतिभावंतांची निवड केली जाणार आहे. देशभरातील जनतेला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी यात मिळणार असून ऑनलाइन ऑडीशन्सला लवकरच सुरूवात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी तीन प्रसिद्ध व्यक्तींना मंचावर एकत्र आणले आहे. ‘वेब सीरिज’ फेम सुमित व्यास त्याच्या खास शैलीत सूत्रसंचालन करणार असून गायक मिका सिंग आणि कोरिओग्राफर गीता कपूर यात परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनचा हा डोस देण्यासाठी आणि वीकेंड गाजवण्यासाठी हा शो सज्ज झाला आहे.

वाचा : त्या चर्चा केवळ अफवा; भन्साळींचा चित्रपट नाकारण्याविषयी हृतिकने केला खुलासा

या शोविषयी मिका म्हणतो की, ‘मी अनेक गायनाच्या शोमध्ये परीक्षक म्हणून होतो. मात्र हा थोडा आगळावेगळा कार्यक्रमा आहे. इथे मी अशा स्पर्धकांना पाहणार आहे, जे काहीही करू शकतात.. गाणं, फ्री- स्टाइल डान्स, रोबोटिक डान्स आणि बरंच काही. हा माझ्यासाठी एक अगदी नवा अनुभव असेल. या कार्यक्रमासाठी मी फारच उत्सुक आहे.’

येत्या २१ जुलैपासून हा कार्यक्रम सोनी सब वाहिनीवर सुरू होणार आहे.