News Flash

केवळ जुन्या जाणत्यांच्या जिवावर…

अमृतसरमध्ये एका सुखवस्तू कु टुंबाची कर्तीधर्ती असलेल्या सरदार कौरची (नीना गुप्ता) ही कथा आहे.

|| रेश्मा राईकवार

भारत-पाकिस्तान फाळणीत दडलेल्या न जाणो अशा कित्येक कथा आहेत ज्या अजूनही कधी कधी डोकं  वर काढतात. आपल्यापर्यंत कु ठल्या ना कु ठल्या माध्यमातून पोहोचतात. नातीगोती-घरदार सगळं मागे सोडून नव्या जागी वसलेली कित्येक मनं अजूनही त्या काळाच्या, त्या जागेच्या, घटनांच्या आठवणीत हरवलेली दिसतात. त्यांचं दु:ख, त्यांचं प्रेम, त्यांचा राग आजही आपल्या अंगावर काटा आणतो. काश्वाी नायर दिग्दर्शित ‘सरदार का ग्रँडसन’ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट याच फाळणीच्या रक्तरंजित इतिहासात दडपल्या गेलेल्या एका प्रेमकथेचा धागा घेऊन पुढे येतो. जुन्या जाणत्या कलाकारांना घेऊन के लेल्या या चित्रपटात त्यांचा अभिनय वगळता प्रेमकथेतूनही फारसे काही हाती लागत नाही.

अमृतसरमध्ये एका सुखवस्तू कु टुंबाची कर्तीधर्ती असलेल्या सरदार कौरची (नीना गुप्ता) ही कथा आहे. वयाने थकलेल्या सरदारला गंभीर आजार झाला आहे, आयुष्याचे काहीच दिवस तिच्याकडे शिल्लक आहेत. आणि या अखेरच्या दिवसांत इतकी वर्षं खोलवर मनात दडवलेलं दु:ख, रितेपण तिला खायला उठलं आहे. लाहोरच्या कबूतर गल्लीत जिथे तिने आपला छोटासा आशियाना सजवला होता, त्या घराची सय तिच्या मनात दाटून आली आहे. फाळणीने माजवलेल्या धर्मांध दुहीत तिने निगुतीने मांडलेल्या संसाराची राखरांगोळी झाली. जे घडलं त्याचं दु:ख करायलाही वेळ न मिळालेल्या सरदारने एका रात्रीत आपल्या तान्ह््याला काखोटी बांधून सीमेपल्याडच्या देशात प्रवेश के ला. आज इतक्या वर्षांनंतर भरल्या कु टुंबात असलेल्या सरदारला तिचं लाहोरमधलं रिकामं घर साद घालत आहे. तिला लाहोरच्या घराची लागलेली आस आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा तिचा नातू अमरीक (अर्जून कपूर) या दोघांची ही कथा आहे. काश्वाी नायर दिग्दर्शित चित्रपटाच्या या कथेचा उत्तरार्ध थोडासा नवीन आणि गमतीशीर आहे. पण त्यात गंमत असूनही के वळ त्याचा वापर करत प्रेमकथा जपण्याचा अट्टहास इथेही पूर्ण के लेला दिसतो. त्यामुळे काहीतरी वेगळं मिळत आहे म्हणता म्हणता हा चित्रपट निराश करतो.

नाही म्हणायला या चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा फार सुंदर लिहिली गेली आहे. फाळणीच्या काळात नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणारी नाजूक चणीची सुंदर सरदार असो वा आता इतक्या मोठ्या कु टुंबाची सूत्रं घट्ट हातात धरून ठेवणारी खमकी सरदार असो. ती इरसाल आहे, हट्टी आहे, काहीशी हेके खोरही आहे आणि बरीचशी मजेशीरही आहे. एक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून आपल्याकडच्या कु ठल्याही साचेबद्ध नायिके च्या चौकटीत बसणारी ती नाही आणि म्हणून ती वेगळी वाटते. या व्यक्तिरेखेसाठी नीना गुप्ता यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आत्ताच्या घडीला नाही. मात्र नीना गुप्ता यांना ऐंशीची सरदार बनवण्यासाठी ओढूनताणून प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे. अनेक प्रसंगांत तो मेकअप विचित्र पद्धतीने लक्षात येतो. नीना गुप्तांचा सहज अभिनय असला तरी त्यांच्या साठीत पोहोचलेल्या मुलासाठी कं वलजीत सिंग या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. कं वलजीत आणि नीना गुप्ता ही एके काळची लोकप्रिय जोडी. या दोघांनीही एकत्र काम के लेलं आहे. कं वलजीत, सोनी राजदान यांना मुलगा आणि सुनेच्या भूमिके त पचवणं जड जातं. त्यातल्या त्यात आजी आणि नातू म्हणून नीना गुप्ता-अर्जुन कपूर ही जोडी जमून आली आहे. तरुण सरदारच्या भूमिके त अदिती राव हैदरी कमालीची सुंदर दिसली आहे, जॉन अब्राहमच्या वाट्याला फारशी भूमिका आलेली नाही. अमरीकच्या प्रेयसीची व्यक्तिरेखाही मुळात खूप कणखर दाखवण्यात आली असली तरी कथेच्या ओघात नेहमीप्रमाणे तिचं महत्त्व कमी करून नायकाचं पारडं जड करण्यात आलं आहे. या अशा अनेक ढिसाळ चुकांमुळे कथा आणि मांडणी दोन्हींत आलेला सरधोपटपणा चित्रपटाचा प्रभाव कमी करतो. नीना गुप्ता यांच्या अभिनयाला तोड नाही. अर्जुन क पूरचा बाकी रांगडेपणा ठीक असला तरी त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही. त्यामुळे नीना गुप्ता यांच्या जोडीने कं वलजीत, सोनी राजदान, कु मुद मिश्रांसारख्या जुन्या जाणत्या कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांतून चित्रपट सावरून धरला आहे. आजीच्या दु:खाशी समरस होत तिला तिचा आनंद मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या नातवाची ही थोडीशी वेगळी कथा त्यातल्या काही गंमतीजमतींमुळे निश्चिातच लक्षात राहते.

सरदार का ग्रँडसन

दिग्दर्शक – काश्वी नायर

कलाकार – नीना गुप्ता, अर्जून कपूर, रकु ल प्रीत सिंग, कं वलजीत सिंग, सोनी राजदान, कु मूद मिश्रा, अदिती राव हैदरी, जॉन अब्राहम, दिव्या सेठ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:03 am

Web Title: india pakistan partition arjun kapoor story akp 94
Next Stories
1 स्वामी साकारताना…
2 संजीवनीचा खाकी साज
3 ‘डिस्कव्हरी’ची पर्यावरण संवर्धन मोहीम‘
Just Now!
X