युजवेंद्र चहल, टी. नटराजन आणि इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलच्या फिरकीच्या जाळ्यात कांगारु अकडले. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयावर चहलची गर्लफ्रेंड धनाश्री वर्मा हिने आनंद व्यक्त केला आहे. “मला तुझ्यावर गर्व आहे असं म्हणत तिने चहलवर कौतुकाचा वर्षाव केला.” तिची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – VIDEO: रिअल लाईफ सुपरहिरो; अभिनेत्याने डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जाडेजाचं मैदानावर नसणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडत होत. त्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल टाकत आणि धावा बहाल करत कांगारंना मदतच केली. अखेरीस चहलने कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, ३५ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर चहलनेच स्टिव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडलं.

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

यानंतर फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडत टी. नटराजनने कांगारुंच्या अडचणींमध्ये भर टाकली. मॅक्सवेल नटराजनची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली पहिली विकेट ठरला. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टलाही नटराजनने माघारी धाडलं, त्याने ३४ धावा केल्या. हा धक्का कमी होता तोच चहलने मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवत कांगारुंना पाचवा धक्का दिला, ज्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्याऐवजी कांगारुंचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावरुच शकले नाहीत. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ तर दीपक चहरने १ बळी घेतला.