प्रसिद्ध मॉडल, लेखिका, अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. वयाच्या १६ वर्षी तिच्यावर बलात्कार झाल्याचं पद्मा लक्ष्मीने सांगितलं आहे. एका वृत्तपत्रात खुलं पत्र लिहित ३२ वर्षांपर्यंत याबाबत मौन का बाळगलं हे पद्मा लक्ष्मीने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पत्रात पद्मा लक्ष्मीने म्हटलं की, ‘तेव्हा मी एका २३ वर्षीय तरुणाला डेट करत होते. एकमेकांना डेट करू लागल्याच्या काही महिन्यांनंतर नववर्षाच्या संध्याकाळी त्याने माझ्यावर बलात्कार केला.’ या घटनेबाबत इतकी वर्ष कुठेच वाच्यता का केली नाही हेसुद्धा तिने या पत्रात सांगितलं.

‘मी सात वर्षांची असताना माझ्या सावत्र वडिलांच्या एका नातेवाईकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही गोष्ट जेव्हा मी आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी मला आजी- आजोबांकडे राहण्यासाठी भारतात पाठवलं. जर तुम्ही उघडपणे बोललात, अन्यायाविरोधात आवाज उठवलात तर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. या घटनेनंतर मी कोणावर सहजपणे विश्वास ठेवू शकत नव्हते. हे सर्व माझ्या जोडीदाराला आणि मानसोपचारतज्ज्ञाला सांगायलाही मला खूप वर्षे लागली,’ असं ती या पत्रात म्हणाली.

अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठीचे उमेदवार ब्रेट केवेनॉ यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याची घटना ताजी असतानाच पद्मा लक्ष्मीने हा खुलासा केला आहे. पद्मा लक्ष्मीवर झालेल्या अत्याचाराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की, ‘बलात्कार झाला तेव्हाच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे होती.’

पद्मा लक्ष्मीने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बूम’ या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफसोबत भूमिका साकारली होती. २००४ मध्ये तिने लेखक सलमान रुश्दी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian american model padma lakshmi reveals she was raped at 16 explains why she kept silent
First published on: 26-09-2018 at 16:31 IST