25 February 2021

News Flash

‘या’ अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या चर्चांवर युजवेंद्र काय म्हणतोय पाहिलं का?

आपल्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता खुद्द युजवेंद्रनेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

युजवेंद्र चहल

भारतीय क्रिकेट संघातील बऱ्याच खेळाडूंची नाव काही अभिनेत्रींशी जोडली जातात. मुळात अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केल्याचीही उदाहरणं आहेत. या कधीही न संपणाऱ्या चर्चांमध्ये आता नव्याने लक्ष वेधतोय तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल. आरसीबीच्या संघातील गोलंदाजाच्या फळीमध्ये असणारा हुकमी एक्का म्हणून युजवेंद्रकडे पाहिलं जातं. असा हा स्टार खेळाडू त्याच्या गोलंदाजीसोबतच खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि एका कन्नड अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.

कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला युजवेंद्र डेट करत असून, येत्या काही दिवसांमध्ये तोही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. आपल्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता खुद्द युजवेंद्रनेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ‘माझ्या आयुष्यात कोणतीच महत्त्वाच गोष्ट घडत नाहीये. मी लग्न करत नाहीये. तनिष्का आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे मी माध्यांना आणि चाहत्यांना विनंती करतो की कृपा करुन चुकीची माहिती पसरवू नका. तुम्ही सर्वजण माझ्या खासगी आयुष्याविषयी काहीही बोलताना इतकी काळजी घ्यावी अशीच माझी अपेक्षा आहे. लग्नाविषयीच्या चर्चांना उगाचच हवा देऊ नका. किंबहुना कोणत्याही गोष्टीविषयी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी त्याची पडताळणी करुन घ्या’, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

युजवेंद्रने केलेली ही पोस्ट पाहता त्याच्या आणि तनिष्काच्या नात्याविषयी आतातरी या अफवांना वाव मिळणार नाही असं म्हणावं लागेल. गेल्या बऱ्याच दिवसांपासून युजवेंद्र आणि तनिष्काच्या डेटिंगविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच काय, तर येत्या काळात ते दोघंही लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण, आता मात्र हे संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे हेच खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 2:49 pm

Web Title: indian cricket team and ipl 2018 rcb player yuzvendra chahal is dating kannada actress tanishka kapoor
Next Stories
1 कृष्णप्पा गौथमने केलेला खेळ अविश्वसनीय – अजिंक्य रहाणे
2 पंजाबविरुद्ध दिल्लीला घरच्या प्रेक्षकांचे बळ
3 IPL 2018 – प्ले ऑफचे सामने पुण्याऐवजी लखनऊला हलवणार?, बीसीसीआयकडून चाचपणी सुरु
Just Now!
X