News Flash

कपिलच्या शोमध्ये क्रिकेटर्सची विनोदी खेळी

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपला असून, मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएलचे दहावे पर्व गाजवले असे म्हणायला हरकत नाही. आता आयपीएल संपले म्हणजे क्रिकेटपटू पुन्हा एकदा विविध क्रिकेट

द कपिल शर्मा शो

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपला असून, मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएलचे दहावे पर्व गाजवले असे म्हणायला हरकत नाही. आता आयपीएल संपले म्हणजे क्रिकेटपटू पुन्हा एकदा विविध क्रिकेट मालिकांमध्ये व्यस्त होणार असेच तुम्हाला वाटत असेल. कारण, अवघ्या काही दिवसांवर आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता सध्या क्रीडाप्रेमींमध्ये पाहायला मिळते आहे. पण, क्रिकेटच्या मैदानामध्ये घाम गाळण्याआधी सुरेश रैना, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये या क्रिकेटपटूंनी हजेरी लावत धमाल केल्याचे त्यांचे फोटो पाहून लक्षात येतंय. हार्दिक पंड्या आणि शिखर धवनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कपिलच्या शो मधील काही फोटो पोस्ट केले आहेत. शिखर धवन आणि हार्दिक पंड्याने हे फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये कपिलच्या शोमध्ये येण्याचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळतंय.

दरम्यान, सुनील ग्रोवरसोबत झालेल्या वादानंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या टीआरपीवर या साऱ्याचा परिणाम झाला होता. बऱ्याच रिअॅलिटी शोमुळे कपिलचा शो टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याचे पाहायला मिळाले होते. पण, त्यानंतर काही नव्या पात्रांच्या मदतीने आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना आमंत्रित करत कपिलने पुन्हा एकदा शोच्या टीआरपीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचा या शोकडे असणारा ओघ वाढला आहे. त्यातही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर कपिलच्या शोमध्ये आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंनी हजेरी लावल्यामुळे सेटवर एकच हशा पिकला होता. खेळपट्टीवर नेहमी धावा, षटकांच्या गणिताचा अंदाज घेत खेळणाऱ्या या खेळाडूंचं वेगळं रुप या कार्यक्रमात पाहायला मिळालं.

वाचा: ‘प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 4:07 pm

Web Title: indian cricket team members visits the kapil sharma show hardik pandya suresh raina and shikhar dhawan
Next Stories
1 प्रियांका चोप्रा कट्टर भारतीय, प्रश्नोत्तरावेळी दिलेली उत्तरं तर पाहा…
2 रणबीर- कतरिनाची हेरगिरी नक्की कशासाठी?
3 अबब! ‘बाहुबली २’ने हेही साध्य केलं…
Just Now!
X