16 December 2017

News Flash

श्रद्धा कपूरला घेऊन या क्रिकेटरला जायचंय आयलँडवर

हे दोघं कधी एकत्र फिरताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 7:54 PM

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरचे चाहते फक्त तुम्ही आम्हीच आहात असे नाही, भारतीय क्रिकेट संघातही असे खेळाडू आहेत, ज्यांना श्रद्धा फार आवडते. विराट कोहली आणि अनुष्काच्या शर्मा यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आले असतानाच, अजून एका भारतीय क्रिकेटरच्या वक्तव्याने माध्यमांना नवे गॉसिप मिळाले आहे. या भारतीय क्रिकेटरला अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत निर्मनुष्य अशा आयलँडवर जायचे आहे.

हा भारतीय खेळाडू म्हणजे आयपीएलमध्ये सध्या आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणारा हैदराबाद संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेऊन तो पर्पल कॅपचा आघाडीचा मानकरी झाला आहे.
भुवनेश्वर कुमारचा एक व्हिडिओ नुकताच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याला निर्मनुष्य अशा आयलँडवर जर कोणा तीन व्यक्तींना घेऊन जायचे असेल तर कोणाला घेऊन जाशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी ही दोन नावं ऐकून कोणालाही आश्चर्य वाटले नाही, पण जेव्हा त्याने श्रद्धाचे नाव घेतले तेव्हा तिथे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. भुवनेश्वर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फॅन असल्याचे पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. भुवनेश्वरचे हे वक्तव्य आणि क्रिकेट-बॉलिवूडमध्ये असणारे नाते पाहता भविष्यात जर हे दोघं कधी एकत्र फिरताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

भुवनेश्वरच्या सध्याच्या क्रिकेट फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर, किंग्ज इलेव्हन पंजाबच्याविरोधात खेळताना पाच विकेट घेत त्याने आतापर्यंत १५ विकेट्स मिळवण्याचा आकडा गाठला आहे. यामुळे तो पर्पल कॅपचा आघाडीचा दावेदार आहे. गेल्या वर्षीही आयपीएलमध्ये त्याने पर्पल कॅप जिंकली होती.

First Published on April 21, 2017 7:48 pm

Web Title: indian cricketer bhuvneshwar kumar wants to take shraddha kapoor to a deserted island