12 November 2019

News Flash

”नेहाला स्पर्धकाने किस केलं तेव्हा परीक्षक शांत का?”; नेटकऱ्यांच्या प्रश्नावर विशालचं उत्तर

विशालने ट्विटरद्वारे हे उत्तर दिले आहे

संपूर्ण देशभरात इंडियन आयडल पर्व ११चे ऑडिशन सुरु आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. सध्या सोशल मीडियावर शोच्या ऑडिशनचे व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑडिशनला आलेल्या एका स्पर्धकाने नेहा कक्करला जबरदस्ती किस केल्यामुळे शोच्या चर्चांना उधाण मिळाले आहे. या स्पर्धकाचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.

नेहासोबत घडलेल्या या प्रकाराने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. अनेकांनी हा प्रकार घडला तेव्हा परिक्षक विशाल दादलानी आणि अनु मलिक दोघांनीही गप्प राहणे का पसंत केले? त्यांनी त्या स्पर्धकाला सुनावले का नाही असे अनेक प्रश्न उभे केले आहेत. एका चाहत्याने तर विशाल दादलानीला या बाबत ट्विट करुन विचारले आहे. आता विशालने त्या चाहत्याला प्रत्युत दिल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : Indian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते ‘इतके’ मानधन

‘मी पोलिसांना बोलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र नेहाने त्या स्पर्धकाला जाऊ दिले. त्या स्पर्धकाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची मदत नक्कीच करु’ असे उत्तर विशालने दिले आहे.

आणखी वाचा : नेहाला पाहून भान विसरला; ऑडिशनमध्येच केलं किस

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ऑडिशमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान नेहा कक्करचा एक चाहता तिच्यासाठी काही गिफ्ट घेऊन शोच्या मंचावर येतो. तो एक-एक करुन नेहाला गिफ्ट देतो. ते पाहून नेहा आनंदी होते आणि त्या स्पर्धकाला मिठी मारते. अचानक तो स्पर्धक कोणताही विचार न करता नेहाच्या गलावर किस घेतो. शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण स्पर्धकाला थांबवतो आणि नेहा देखील तेथून बाजूला होते.

First Published on October 21, 2019 6:51 pm

Web Title: indian idol 11 vishal dadlani wanted call police after contestant forcibly kissed neha kakkar avb 95