News Flash

खुद्द आदित्य नारायणनेच केला इंडियन आयडलचा पर्दाफाश

याची माहिती आदित्यने एका मुलाखतीत दिली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ आहे. ‘इंडियन आयडल’चे यंदाचे हे १२ पर्व सुरु आहे. छोट्या पडद्यावरील टीआरपीच्या लिस्टमध्ये टॉप ५ मध्ये हा शो नेहमीच असतो. एवढंच नाही तर हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, या शो मधील पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल हे दोन स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात. हे दोघे प्रेमात असल्याचं शो मध्ये दाखवण्यात आलं तर आता हे सगळं खोटं असल्याचं गायक आणि या शोचा सुत्रसंचालक आदित्य नारायणने सांगितले आहे.

अरुणिता आणि पवनदीप यांच्यात दाखवण्यात आलेली प्रेम कहाणी ही बनावटी असल्याचे आदित्यने एका मुलाखतीत कबूल केले. हे फक्त शो मध्ये विनोद करण्यासाठी केलं होतं. आदित्यने प्रेक्षकांना विनंती केली की, त्यांनी स्पर्धकांच्या कामगिरीवर लक्ष द्या. असं असलं तरी, आम्ही सर्वजण तिथे एक व्यक्तीरेखा साकारत आहेत. आम्ही त्या स्टेजवर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो,” असं आदित्य म्हणाला.

पुढे आदित्य म्हणाला, “एक एपिसोड ९० मिनिटांचा असतो आणि त्या वेळेत प्रेक्षकांचे मनोरंजन हा त्यांचा हेतू आहे. पवनदीप आणि अरुणिता यांनी एकमेकांना छेडले तरी त्यांच्यात असलेल्या या मस्तीचा ते आनंद घेतात. ते या गोष्टीला गंभीरतेने घेत नाही.”

आणखी वाचा : गीता मॉं ने गपचुप केलं लग्न? सिंदूर लावलेला फोटो केला शेअर

पुढे आदित्य मालिकेचं उदाहरण देत म्हणाला, “लोकांना माहित आहे की मालिकेतील एक सीन शूट केल्यानंतर कलाकार हे पुन्हा एकदा त्यांच्या खऱ्या पार्टनरकडे जातात. तर रिअॅलिटी शो बद्दल एवढे प्रश्न का आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:47 pm

Web Title: indian idol 12 aditya narayan reveals pawandeep rajan and arunita kanjilal love story is fake deets inside dcp 98
Next Stories
1 Khatron Ke Khiladi 11 : पहिलं एलिमिनेशन ! ‘बिग बॉस’चा हा एक्स कंटेस्टेंट झाला आऊट
2 “आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..”; अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत
3 The Family Man 2: प्रतिक्षा संपली, या दिवशी रिलीज होणार मनोज वायपेयीच्या सिरीजचा ट्रेलर!
Just Now!
X