News Flash

Indian Idol: ‘सर्व स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले होते’, अमित कुमार यांचा खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘इंडियन आयडल’कडे पाहिले जाते. सध्या इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु आहे. नुकताच शोमध्ये किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याच एपिसोडमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित यांनी शोमध्ये सर्वच स्पर्धकांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

इंडियन आयडल १२मधील परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान अमित यांनी एका मुलाखतीमध्ये शोबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी सांगितले की, ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते.’

पुढे ते म्हणाले, ‘त्यांनी मला जे सांगितलं ते मी केलं. स्पर्धकांनी कसे ही गाणे गायले तरी त्यांची प्रशंसा करायची. कारण ते किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहत होते. मी फक्त त्यांनी जे सांगितलं ते केलं. मी तर त्यांच्याकडे स्क्रीप्टदेखील मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 7:10 pm

Web Title: indian idol 12 kishore kumar episode son amit kumar says did it for money avb 95
Next Stories
1 “इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका”; लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना आशा नेगीने फटकारलं
2 ‘बाबा… तुमच्याशिवाय…’, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट
3 लेकीचे पत्र पाहून शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X