News Flash

‘इंडियन आयडल मराठी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे

indian idol marathi, indian idol,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडल. या शोच्या मंचावर अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे. ‘इंडियन आयडल’ या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. आता ‘इंडियन आयडल मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडल’चे १२ वे पर्व पार पडले. पवनदीप राजन या पर्वाचा विजेता ठरला. आता इंडियन आयडल मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘इंडियन आयडल’ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेत. आता ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना ‘इंडियन आयडल – मराठी’ लवकरच पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 3:19 pm

Web Title: indian idol marathi coming soon avb 95
Next Stories
1 Bigg Boss OTT- दिव्याचा गेमप्लॅन पाहून शमिता शेट्टीला फुटला घाम; राकेश म्हणाला…
2 “मानवची भूमिका साकारण्यासाठी मी स्वत:ला…”, ‘पवित्र रिश्ता २.०’ बद्दल शाहीर शेखने केला खुलासा
3 प्रियांका चोप्राच्या ‘मॅट्रिक्स ४’ चा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित!
Just Now!
X