05 March 2021

News Flash

अॅमी जॅक्सनच्या ठुमक्यांनी होणार आयपीएलचा शुभारंभ!

पुण्याच्या मैदानात मराठमोळ्या रितेशची दिसणार जादू…

भारतामध्ये आजच्या घडीला क्रिकेट आणि बॉलिवूडबद्दल तुफान क्रेझ असल्याचे दिसून येते. मग, इंडियन प्रिमियर लीगची (आयपीएल) मेजवानी म्हणजे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी मैदानातून आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होत आहे. सनराइज हैदराबाद आणि रॉयल चॅलेंज बंगलुरु यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या पर्वाला सुरुवात होत आहे. हैदराबादच्या मैदानात हे दोन संघ मैदानात उतरण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात अॅमी जॅक्सन परफॉर्मन्स सादर करणार आहे. ब्रिटिश ब्युटी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयपीएलच्या रंगारंग कार्यक्रमामध्ये खास परफॉर्मन्स सादर करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल शुभारंभाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अॅमी जॅक्सन ६ मिनिटांचा परफॉर्मन्स सादर करणार आहे. ती ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ या लोकप्रिय गाण्यासह ‘काला चष्मा…’ या गाण्यावर थिरकताना दिसेल. अॅमीसोबत या कार्यक्रमात स्थानिक चेहरे देखील रंग भरताना दिसणार आहेत. आठसंघाच्या कर्णधारांच्या उपस्थित रंगणाऱ्या या कार्यक्रमात लेजर शोच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएनच्या रंगारंग कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर गुरुवारी पुणे येथील गहुंजेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात रंगणाऱ्या सामन्यापूर्वी मराठमोळा रितेश देशमुख परफॉर्मन्स सादर करणार आहे.

अॅमीच्या कारकीर्दीविषयी बोलायचे झाल्यास सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘२.०’ या चित्रपटातून अॅमी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार पहिल्यांदाच रजनीकांत यांच्याविरोधात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१२ मध्ये अॅमीने ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०१५ मध्ये ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 11:27 pm

Web Title: indian premier league 2017 amy jackson will perform opening ceremony at rajiv gandhi international stadium and riteish deshmukh will perform at pune ipl
Next Stories
1 विनोद खन्ना रुग्णालयात दाखल
2 करणच्या जुळ्या मुलांबद्दल काजोल म्हणते..
3 बयोआजींच्या ‘कान’वारीमुळे राधाची सुटका?
Just Now!
X