29 January 2020

News Flash

मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणं मितालीच्या चाहत्यांना रुचलं नाही

नेटीझन्सनी केलं ट्रोल

मिताली राज नुकतीच 'वोग इंडिया' मासिकाच्या कव्हर पेजवरही झळकली.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज चर्चेत आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तिच्या आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुलींसाठी प्रेरणा ठरलेली मिताली राज नुकतीच ‘वोग इंडिया’ मासिकाच्या कव्हर पेजवरही झळकली. मात्र तिचं हे झळकणं चाहत्यांना फार रुचलं नाही असंच चित्र दिसतंय.

‘वोग इंडिया’ या मासिकाच्या कव्हर पेजवर मिताली शाहरूख खान आणि नीता अंबानी यांच्यासोबत पाहायला मिळत आहे. मात्र तिचा हा अंदाज चाहत्यांना फारसा न भावल्याने सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही चाहत्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे. चेहऱ्यावरील केलेला भरभरून मेकअप तुला चांगला दिसत नाही, अशी कमेंट एका नेटिझनने केली आहे.

वाचा : ‘बाहुबली २’ला टक्कर देण्यासाठी ‘पद्मावती’ सज्ज?

मितालीच्या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास, ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ने त्यासाठीचे सर्व हक्कही मिळवले आहेत. ‘वायकॉम १८’शी संलग्न अजित अंधारे यांनी याविषयीची माहिती दिल्याचं वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलं आहे. ‘मिताली राजसोबत अशा प्रकारे जोडलं जाणं ही अभिमानास्पद बाब आहे. महिला क्रिकेटसंघाच्या यशात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्यांमध्ये मितालीचं महत्त्वाचं योगदान आहे’, असं ते म्हणाले. आता मितालीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on September 27, 2017 1:01 am

Web Title: indian womens cricket team captain mithali raj trolled vogues tenth anniversary cover shah rukh khan nita ambani
Next Stories
1 ‘बाहुबली २’ला टक्कर देण्यासाठी ‘पद्मावती’ सज्ज?
2 सुपरस्टार झायराला तो म्हणतोय ‘हू तने प्रेम करु छू..’
3 यांनी घेतला होता सलमानशी पंगा
Just Now!
X