न्यूयॉर्कमध्ये कॅन्सवर उपाचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रेनं ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ’च्या मुलांसाठी एक भावनिक संदेश दिला आहे. खरं तर याआधीच्या काही पर्वात सोनालीनं परीक्षकाची भूमिका निभावली आहे. सोनालीच्या दिलखुलास स्वभावानं ती लहान मुलांची सर्वात आवडती परीक्षक ठरली. मात्र हा शो सुरू होण्याच्या आधीच तिला कॅन्सरचं निदान झालं.
शोच्या ऑडिशनपासून ते प्रसिद्धीपर्यंत सोनालीनं महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र कॅन्सरमुळे तिनं हा शो सोडला. पण तिचा जीव मात्र अजूनही त्या स्पर्धकांमध्येच अडकून आहे. आता शोच्या अंतिम भागात पोहोचलेल्या स्पर्धकांसाठी सोनालीनं संदेश पाठवला आहे. ‘तुम्ही सगळी मुलं खूप मेहनत घेत आहेत अशीच मन लावून मेहतन करा. तुमच्या सोबत असावं असं मला सारखं वाटतं. तुम्ही सगळी मुलं खूपच छान आहात. कधी कधी तुमचं सादरीकरण पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू तरळतात’ असा संदेश सोनालीनं लिहिला आहे.
सोनालीनं माघार घेतल्यानंतर आता हुमा कुरेशी या शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला आहे. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असून तिची तब्येत सुधारत आहे अशी माहिती तिचे पती गोल्डी बेहल यांनी काही दिवसांपूर्वी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 5:00 pm