एका ज्वेलरी ब्रॅण्डच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात भारतीय-अमेरिकन गायक मिकी सिंग पहिल्यांदा भारतात परफॉर्म करणार आहे. ९ ऑगस्ट रोजी त्याच्या या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोतिवाला अॅण्ड सन्सच्या ‘कावाची’ नामक दागिन्यांच्या नव्या मालिकेचा ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत उद्घाटन सोहळा पार पडत आहे, या सोहळ्याद्वारे भारतातील आपला पहिलाच गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यासाठी गायक मिकी सिंग राजधानीत दाखल होत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. ‘बॅड गर्ल’ हा त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध असून, यूटयुबवर या गाण्याच्या व्हिडिओला २० लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती २०१३ सालच्या ‘माईकस्टेप’मुळे. संपूर्ण उत्तर अमेरिकेत त्याने ‘माईकस्टेप’चे ५० शहरांतून कार्यक्रम केले. भारतीय प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध आणि आश्चर्यचकीत करण्यासाठी तो गाण्याच्या खास अशा नव्या रचनेवर काम करत आहे. याशिवाय, मोतिवाला अॅण्ड सन्सच्या कार्यकारी संचालक साची सिंगसह तो स्वत:ची बो-टायची मालिका पहिल्यांदाच सादर करणार आहे.