25 November 2020

News Flash

११ डिसेंबरला थिएटरमध्ये धडकणार ‘इंदू की जवानी’?

'इंदू की जवानी'मध्ये 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. या काळामध्ये सर्वच क्षेत्रातील कामकाज बंद होते. त्यामुळे सहाजिकच चित्रपटसृष्टीदेखील ठप्प झाली होती. चित्रपटगृह, नाट्यगृह सारं काही बंद होतं.मात्र, आता अनलॉकच्या दिशेने प्रवास सुरु झाला असून हळूहळू प्रत्येक टप्प्यातील कामकाज सुरु होताना दिसत आहे. यात चित्रपटगृहदेखील सुरु करण्यात आली आहे.

चित्रपटगृह सुरु होणार असल्याचं समजल्यानंतर सोशल मीडियावर अचानकपणे ‘इंदू की जवानी’ हे नाव ट्रेण्ड होऊ लागलं. त्यामुळे अनेकांना ‘इंदू की जवानी’ हे नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न पडला. तर हे आगामी बॉलिवूडपटाचं नाव असून लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘इंदू की जवानी’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ११ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे.
दरम्यान, कियारा अलिकडेच लक्ष्मी या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती आता इंदू की जवानी, जुग जुग जियो या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:48 pm

Web Title: indoo ki jawaani to hit theatres on december 11 ssj 93
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहचं नाव आलं समोर; NCBने बजावले समन्स
2 Bigg Boss: कॅप्टन होण्यासाठी काहीही; काम्या-संग्राम ४१ तास बंद होते लहानशा खोक्यात
3 कपिलच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?
Just Now!
X