31 October 2020

News Flash

प्रदर्शनापूर्वीच सलमानचा ‘ईन्शाल्ला’ ठरतोय हिट, कमावले इतके कोटी

चित्रपटाचे सॅटलाईट राइट्स अजून विकले गेले नाहीत

सलमान खान आणि आलिया भट्ट

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमानने भन्साळींसोबत काम केले होते. त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. या चित्रपटानंतर १९ वर्षांचा काळ लोटला पण दिग्दर्शक भन्साळी आणि सलमानची जोडी काही एकत्र काम करताना पाहायला मिळाली नाही. आता मात्र इतक्या वर्षांनंतर सलमान संजय लीला भन्साळी यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात सलमान काम करण्यास तयार झाला आहे. ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री अलिया भट्ट देखील काम करणार आहे. तसेच या दोघांची जोडी रोमॅन्टीक रुपात दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे थिएट्रिकल राइट्स ज्या किंमतीला विकले गेले आहेत ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. सूत्रांच्या माहितीनुसार भन्साळी यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटाचे थिएट्रिकल राइट्स १९० कोटी रुपयांना विकले असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार असून लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच चित्रपटाच्या सॅटलाईट राइट्सची अजून विक्री केली नसल्याचे म्हटले जात आहे. परंतु थिएट्रिकल राइट्सच्या किंमतीमुळे सॅटलाईट राइट्स देखील मोठ्या किंमतीला विकले जाण्याची शक्यता आहे.

‘ईन्शाल्ला’ चित्रपटात सलमान ४० वर्षांच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर २० वर्षांची आलिया इन्डस्ट्रीमधील नव्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्या दोघांच्या वयातील फरक अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच चित्रपटात त्या दोघांची जोडी रोमॅन्टीक अंदाजात दिसणार आहे. सलमान आणि आलियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

भन्साळींच्या या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खानच्या नावाचीही चर्चा होती. त्याचप्रमाणे भन्साळी अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी आग्रही असल्याचेही म्हटले जात होते. पण अखेर सलमान आणि आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 1:11 pm

Web Title: inshallah earn 190 crore before movie release avb 95
Next Stories
1 अनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता
2 रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणणारी रानू सलमान कनेक्शनमुळे रातोरात झाली स्टार
3 इलियाना डिक्रूझचं ब्रेकअप? सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो
Just Now!
X