X

Inside Photos : समंथा-नागा चैतन्यच्या लग्नाची गोव्यात धामधूम

६ ते ९ ऑक्टोबर या दिवसांमध्ये समंथा आणि नागा चैतन्यच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत पाहायला मिळेल.

टॉलिवूडमधील ‘सुपरक्युट कपल’ म्हणून ओळखले जाणारे नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लग्नमंडप, विधी, पाहुणे या साऱ्यावर जातीने लक्ष दिले जातेय. नुकतेच समंथा आणि नागा चैतन्यचे कुटुंब गोव्यात लग्नासाठी पोहचले. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ९ ऑक्टोबर या दिवसांमध्ये ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत पाहायला मिळेल.

वाचा : TOP 10 NEWS नागार्जुनच्या मुलाच्या लग्नात होणाऱ्या खर्चापासून ते सचिनच्या ‘त्या’ चाहत्याविषयी सर्व बातम्या एका क्लिकवर

समंथा- नागा चैतन्यच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज हे प्रेमीयुगुल हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्नगाठ बांधतील. त्यानंतर पुन्हा ख्रिस्ती रितीरिवाजांप्रमाणे ते एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतील. गोव्यात हा सोहळा पार पडल्यानंतर हैदराबादमध्ये ‘ग्रँड रिसेप्शन’चे आयोजन करण्यात आले आहे.

वाचा : वरुण धवनच्या भाचीचे ‘हॉट’ फोटो पाहिलेत का?

दरम्यान, या लग्नसोहळ्यापूर्वीच्या तयारीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नासाठी सज्ज असलेल्या चैतन्यचा एक फोटो स्वतः समंथाने शेअर केलाय. चर्चमध्ये होणाऱ्या लग्नात घेण्यात येणाऱ्या वचनांची तो पूर्वतयारी करत असल्याचे या फोटोत दिसते.

अभिनेता आणि चैतन्यचे वडील नागार्जुन यांनीही ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. ‘आमचा मुलगा आता बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज आहे’, असे कॅप्शनही त्यांनी फोटोला दिलेय. या फोटोत नागा चैतन्यसोबत त्याचे वडील नागार्जुन आणि काका व्हिक्टरी वेंकटेश पाहावयास मिळतात.

Our boy is now a bridegroom!! #chaisam pic.twitter.com/nvDvuYwfbT

— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) October 6, 2017

समंथाने लवकरच अक्किनेनी कुटुंबाचा भाग व्हावे यासाठी उत्साही असलेल्या नागार्जुन यांनी आणखी एक फोटो शेअर केलाय. त्याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, ‘आज संध्याकाळी समंथा रुथ प्रभू आमच्या कुटुंबाचा हिस्सा होईल. या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतोय.’ आज संध्याकाळी हिंदू विवाहपद्धतीनुसार समंथा – नागा चैतन्यचे लग्न होईल.

Waiting for @Samanthaprabhu2 joining the family this evening. pic.twitter.com/7Li77LzHKa

— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) October 6, 2017

आपल्या चाहत्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून समंथाने ट्विटरवर लिहिलेलं की, माझ्या मनात आमच्या लग्नगाठी आधीच बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे, आमच्या लग्नासाठी माझ्यापेक्षा चाहतेच खूप उत्सुक असल्याचे दिसते.

या विवाहसोहळ्यासाठी चाहत्यांसोबतच तेलगू चित्रपटसृष्टीतही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. त्यामुळे त्यांच्या लग्नात इंडस्ट्रीतील बरेच प्रसिद्ध चेहरे दिसणार यात शंका नाही. लग्नानंतर हे नवविवाहित दांपत्य फार मोठ्या सुट्टीवर जाणार नसून, काही दिवसांतच ते पुन्हा आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र होणार आहेत.

Outbrain