News Flash

इन्स्टाग्रामने कंगना रणौतची पोस्ट केली डिलीट; म्हणाली “इथे आठवडाभर टिकणं मुश्किल”

पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगणा रणौत ही वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. खळबळजनक वक्तव्य करून कायम वाद ओढावून घेणाऱ्या कंगनावर नुकतीच ट्विटरने कारवाई केलीय. कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरून बेधडक वक्तव्य करण्यास सुरूवात केलीय. मात्र आता इन्स्टाग्राम देखील कंगनाचं एक ट्विट डिलीट केलंय. त्यामुळे इन्स्टाग्रामवरूही कंगनाचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची ही पोस्ट परस्पर डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरूनच संताप व्यक्त केलाय.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यात मी करोनाला संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. कुणाच्या तरी भावना दुखावल्या. म्हणजे दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोव्हिड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मात्र वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त टिकू शकते.” अशी पोस्ट शेअर करत कंगनाने इन्स्टाग्रामवरच निशाणा साधला आहे.

kangana-post (photo-instagrtam@kanganaranaut)

कंगनाची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट करत कंगनाने तिला करोना झाल्याची माहिती दिली होती. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला कल्पना नव्हची हे विषाणू माझ्या शरीरात पार्टी करत असतील. पण मी त्यांना संपवून टाकेन. आपल्यावर कोणत्याही शक्तीचा परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही घाबरलात तर ती तुम्हाला जास्त घाबरवेल. चला या कोव्हिडला नष्ट करून टाकुयात. हे काही नाही थोड्या काळासाठी येणारा ताप आहे. ज्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. आता तो आणखी काही लोकांना होतेय. हरहर महादेव” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.” अशी पोस्ट तिने केली होती.

वाचा: “स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..”; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत
ट्विटर अकाऊंट सस्पेंड
गेल्या काही दिवसांपासून कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील अनेक घडामोडींवर परखड मत व्यक्त करत होती. एवढचं नव्हे तर कंगनाने विविध ट्विट करत अमेरिकेसह इतर देशावर देखील निशाणा साधला आहे. यानंतर कंगनाने बंगाल निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमुळे ती अधिक चर्चेत आली. यानंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 5:01 pm

Web Title: instagram deletes kangana ranaut post of covid positive said cant last here more then week kpw 89
Next Stories
1 Mother’s Day : आईच्या समाजसेवेचे कौतुक करत सोनालीने केले आवाहन
2 विराज कुलकर्णीने शेअर केला ‘माझी आई’ निबंधाचा शाळेतील किस्सा
3 सातारा : फलटण येथे हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉयला अटक; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Just Now!
X