बॉलिवूडमधला यावर्षीचा सर्वात मोठा दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा इटलीत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. इटलीतल्या आलिशान महालात हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात कोणत्याही प्रकराचं विघ्न येऊ नये यासाठी दीप-वीरनं लग्नसोहळ्याचा विमा उतरवला आहे.

दिल्लीमधल्या एका विमा कंपनीकडून दोघांनी ‘ऑल रिस्क पॉलिसी’ काढून घेतली आहे. १२ ते १६ नोव्हेंबर या काळात पार पाडणाऱ्या या विवाहसोहळ्याला विमाचं संरक्षण देण्यात आलं आहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग यामुळं लग्नात अडथळा आल्यास या विम्याचं संरक्षण मिळणार आहे.

लग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार

आहेर नको दान करा, दीप-वीरची पाहुण्यांना विनंती

रविवारी दीपिका -रणवीर आणि त्यांच्या कुटुंबियांचं इटलीत आगमन झालं. इटलीतल्या लेक किमो परिसरातील व्हिला दी बाल्बिआनेलो याठिकाणी दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी सोमवारपासूनच व्हिला परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इटलीतील ७०० वर्षे जुना हा व्हिला पाहण्यासाठी येथे लाखो पर्यटक दरवर्षी येतात. मात्र आठवडाभर हा व्हिला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच लग्नातील समानाची ने- आण करणाऱ्या गाड्यांनाच फक्त वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.

पारंपरिक कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं हा विवाहसोहळा संपन्न होणार असून याच आठवड्या दीपिका आणि रणवीर मुंबईत परतणार आहे. २८ नोव्हेंबरला या दोघांनी जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजनही केलं आहे.