माजी मिस यूनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन आज १९ नोव्हेंबरला आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुश्मिताने १९९४ मध्ये मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकला होता. दोन मुलींची आई असलेल्या सुश्मिताने अजूनपर्यंत लग्न केले नाही. आज तिच्या वाढदिवसा दिवशी जाणून घ्या तिच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टीः

⦁ सुश्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकला होता तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.

⦁ सुश्मिता तेव्हा एक मध्यम वर्गातील मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता तिच्या आइने आणि मीना बाजारातील एका टेलरने मिळून शिवले.

⦁ सुश्मिताने वयाच्या २५ व्या वर्षी आपली पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता.

⦁ असे सांगितले जाते की, सुश्मिताने मिस यूनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली. सुश्मिताचा सामना ऐश्वर्याबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुश्मिता वरचढ ठरली. दोघांनाही एकच प्रश्न विचारला गेला. दोघींना विचारण्यात आले की, जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुश्मिताने उत्तर दिले, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. असे मानले जाते की या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता.

⦁ महेश भट्ट यांच्या दस्तक या सिनेमातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

⦁ सुश्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते.

⦁ सुश्मिताने हिंदी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती.

⦁ सुश्मिताला सापही खूप आवडतात. तिने एक पायथनही पाळला आहे.

⦁ सुश्मिताचा बीवी नंबर वन हा सिनेमा फार गाजला होता. या सिनेमासाठी सुश्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता.

⦁ सुश्मिताने , ‘आंखे’, ‘समय’, ‘मैं हूं ना’, ‘बेवफा’, ‘नो प्रॉब्लेम’ यांसारखे सिनेमे केले आहेत.