बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘हिचकी’ या चित्रपटातून कमबॅक केलं. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक- समीक्षकांकडून कौतुकदेखील करण्यात आलं. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित ‘हिचकी’ या चित्रपटात आपल्यातील एका व्यंगाला आपली सर्वांत मोठी ताकद बनवणाऱ्या महिलेची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. मात्र ही भूमिका सुरुवातीला राणीसाठी नव्हतीच.

‘हिचकी’साठी राणी मुखर्जीला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. या चित्रपटाची कथा खरंतर पुरुष पात्रासाठी लिहिण्यात आली होती. मात्र, जसजशी पटकथा पुढे सरकू लागली तसतशी यातील गाभा अधिक परिणामकारकरित्या मांडण्यासाठी एका स्त्रीपात्राची निकड भासू लागली. त्यामुळे, नंतरच्या टप्प्यात राणी मुखर्जीचा मध्यवर्ती भूमिकेत विचार करत पटकथेत आवश्यक ते बदल करण्यात आले. या चित्रपटाचं नाव खुद्द आदित्य चोप्राने सुचवलं आहे. कारण इतक्या अर्थपूर्ण कथेला तितक्याच ताकदीचं आशयपूर्ण नाव हवं होतं.

bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

वाचा : ‘..आणि त्याने षटकार मारला’; IPLच्या अंतिम सामनादरम्यान मराठीतून समालोचनाचा आनंद घ्या

नैना माथूर (राणी मुखर्जी) हिला शिक्षिका व्हायचं आहे. तिला टॉरेट सिंड्रोमचा त्रास असतो. अनेक मुलाखती आणि बहुधा तितक्याच नकारांनंतर ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत पूर्णवेळ शिक्षिका होऊन आपलं स्वप्न पूर्ण करते. मात्र, थोड्याच काळात तिच्या लक्षात येतं की या वर्गात सगळी उद्धट, मस्तीखोर मुलं भरलेली आहेत. सतत काही ना खोड्या करण्याचेच उद्योग ही मुलं करत असतात. मात्र, नैना या मुलांसाठी काहीतरी करायचं ठरवते. सर्व अडचणींवर मात करत या मुलांना स्वत:च्या क्षमता कळाव्यात यासाठी ती प्रयत्न करते. राणीचा हा चित्रपट आता वर्ल्डवाईड टेलिव्हिजन प्रीमिअरसाठी सज्ज झाला आहे. ‘सोनी मॅक्स’वर येत्या शनिवारी म्हणजेच २६ मे रोजी रात्री ९ वाजता हा चित्रपट पाहता येणार आहे.