News Flash

‘ग्रॅमी’तही पोहोचलं शेतकरी आंदोलन; अजून एका सेलिब्रिटीने दर्शवला पाठिंबा

रेड कार्पेटवर परिधान केला "I Stand with farmers" म्हणणारा मास्क

भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बऱ्याच राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरच्या सेलिब्रिटींनी पोस्ट केल्या, फोटो शेअर केले. आता या यादीत अजून एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. युट्युबर लिली सिंग हिनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

युट्यूबर लिली सिंग काल ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात गेली होती. तिथला तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने मास्क परिधान केला आहे आणि या मास्कवर ‘I stand with farmers’ असा मजकूरही लिहिलेला आहे. लॉस एंजेलिसमधल्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यासाठी तिने हजेरी लावली आणि रेड कार्पेटवरचा अश्या पद्धतीचा मजकूर लिहिलेला मास्क परिधान केलेले फोटोज शेअर केले. यावेली तिने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

या फोटोवर तिने एक लक्षवेधी कॅप्शनही दिलेलं आहे. ती म्हणते, मला माहित आहे की रेड कार्पेट किंवा अवॉर्ड शोजमधल्या वेशभूषेला सर्वात जास्त कव्हरेज मिळतं. त्यामुळे माध्यमांनो, हे पाहा. मोकळेपणाने हेही दाखवा. अशा आशयाचं कॅप्शन देऊन तिने #IStandWithFarmers म्हणत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

पोस्ट केल्यानंतर जवळपास एका तासातच लिलीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.
मुख्यतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर अशा दिल्लीच्या सीमांवर एकत्र येऊन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2021 12:02 pm

Web Title: international celebrity lilly singh supported farmers protest in india vsk 98
Next Stories
1 सुहाना खानने शेअर केला बोल्ड लूक, सोशल मीडियावर फोटोमधील मुलाची चर्चा
2 Indian Idol 12: असं काय झालं की परिक्षकांनी स्पर्धक सवाई भट्टला परफॉर्मन्स दरम्यान थांबवलं
3 “कोण कृष्णाला हे करायला लावतंय, कोणास ठाऊक”; भाच्यासोबतच्या वादावर गोविंदानं केलं भाष्य
Just Now!
X