‘जागतिक महिला दिना’निमित्त डोंबिवलीत दोन दिवस ‘जागतिक चित्रपट महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवात बांगलादेश, इजिप्त, कझाकिस्तान यांसारख्या देशातले चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

९ आणि १० मार्च असे दोन दिवस हा सोहळा रंगणार आहे. प्रतिमा फिल्म सोसायटी, मॉडेल फिल्म सोसायटी आणि भारतीय स्त्री शक्ती प्रस्तुत या चित्रपट महोत्सवात विविध चित्रपट पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे.  या चित्रपट महोत्सवाचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे

९ मार्च
स्थळ : मॉडेल महाविद्यालय ऑडिटोरियम, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व
वेळ : सकाळी १० ते १२
१. लघुपट- एअर / कझाकिस्तान
२. फिचर फिल्म – अ विक

१० मार्च
स्थळ : आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व
वेळ : संध्याकाळी ४.३० ते ८
१. लघुपट- स्टेटमेंट आफ्टर माय पोएट हसबंट डाय / बांगलादेश
२. फिचर फिल्म – नावारा / इजिप्त
३. फिचर फिल्म – तास्फिया / तजाकिस्तान