10 July 2020

News Flash

कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; डब्बू रत्नानीवर संकल्पना चोरीचा आरोप

डब्बू रत्नानीने फोटो केला कॉपी?

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या टॉपलेस फोटोंमुळे जोरदार चर्चेत आहे. या फोटोंसाठी काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी सोशल मीडियाव्दारे तिची खिल्ली देखील उडवली. परंतु आता या फोटोंवरुन एक नवीनच वाद उद्भवला आहे. एका आंतराष्ट्रीय फोटोग्राफरने हे फोटो त्याने काढलेल्या फोटोंची नक्कल असल्याचा आरोप केला आहे.

कियारा अडणीचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने काढले होते. त्याने आपल्या ‘सेलिब्रिटी कॅलेंडर’साठी कियाराचे हे टॉपलेस फोटोशूट केले होते. परंतु मेरी बार्श नामक एका आंतराष्ट्रीय फोटोग्राफरने त्याच्या फोटोंची ही नक्कल असल्याचा आरोप डब्बू रत्नानीवर केला आहे.

मेरी बार्शने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने काढलेला फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये वापरलेली संकल्पना अगदी डब्बू रत्नानीच्या फोटो सारखीच आहे. कियारा प्रमाणेच या फोटोमधील मॉडेलने आपले शरीर पानांमागे झाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी मेरी बार्श आणि डब्बू रत्नानी या दोघांच्याही फोटोंची तुलना करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 9:34 am

Web Title: international photographer calls out dabboo ratnani for plagiarising kiara advanis kiara advani topless photo mppg 94 2
Next Stories
1 कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; डब्बू रत्नानीवर संकल्पना चोरीचा आरोप
2 खळबळजनक : प्रसिद्ध गायकाची गोळ्या घालून हत्या
3 आण्णाभाऊ साठे यांच्या ‘आवडी’मुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं
Just Now!
X