News Flash

कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!

कृतिका दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते.

मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर 'आंतरराष्ट्रीय योग दिन' निमित्त कृतिकाने हे फोटोशूट केले आहे.

योग ही भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. योगमुळे शरीर व मनात परिवर्तन घडते. शारीरिक व मानसिक रित्या निरोगी रहायचे असेल तर नियमित योगा करणे गरजेचे आहे. योगाला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.

आज जगभरात २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होतो. याच पार्श्ववभूमीवर मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर तिचे सुंदर फोटोशूट केले. या फोटोशूट मध्ये अभिनेत्री कृतिका गायकवाड हीने ऊर्ध्व धनुरासन,अंजनेयासन, वृक्षासन , उभया पादांगुष्ठसन,प्रसारित पादोत्तासन, वीरभद्रासन, बद्धकोनासन, उष्ट्रासन, सेतुबंधासन, कटिचक्रासन, अर्धहलासन, हस्तपादासन, मत्स्यासन, पश्चिमोत्तासन, अर्धचक्रासन आणि अजूनही अनेक वेगवेगळी आसने केली. या आसनांसाठी तिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांची निवड केली. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी आणि सीएसटी स्टेशन समोरील सेल्फी पॉईंट ह्या गजबजलेल्या ठिकाणी तिने हे फोटोशूट केले. कोरोना काळात सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी या उद्देशाने तिने हे फोटोशूट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim)

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim)

आणखी वाचा : ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

 

View this post on Instagram

 

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim)

याबद्दल कृतिकाला विचारले असता तिने सांगितले की , “मी नेहमीच २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते. मागील वर्षी मला काहीच करता आले नाही मात्र त्या अगोदर २०१९ मध्ये मी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले होते. २०१८ साली मी आरे कॉलनीच्या निसर्ग रम्य ठिकाणी फोटोशूट केले होते.”

आणखी वाचा : ‘राजू’ सोबत झळकणार ‘श्याम’चा मुलगा, अहना शेट्टी करणार अक्षयसोबत काम!

कृतिका गायकवाड हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ह्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. कृतिकाने ‘विठ्ठला शप्पथ’, ‘नेबर्स’ हे चित्रपट केले असून छोट्या पडद्यावर सुद्धा ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा मराठी कार्यक्रम आणि ‘माय के सी बंधी डो’, ‘शुभविवाह’ या हिंदी कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 7:31 pm

Web Title: international yoga day 2021 krutika gaikwad did some yoga poses at mumbai s historical places dcp 98
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’मधल्या को-स्टारला पाहिलंत का? बिग बी म्हणाले, “परफेक्ट को-स्टार”
2 ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट अक्षयने केला बहिणीला समर्पित
3 ‘राजू’ सोबत झळकणार ‘श्याम’चा मुलगा, अहान शेट्टी करणार अक्षयसोबत काम!
Just Now!
X