19 September 2020

News Flash

“मेकअप करुन वय लपणार नाही”; नेटकऱ्यांनी केलं मलायकाला ट्रोल

'या' फोटोमुळे झाली मलायका ट्रोल

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटपटू कधी कोण ट्रोलर्सच्या निशाण्यावर येईल हे काही सांगता येत नाही. यामध्येच अनेक वेळा बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागतं. कधी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी त्यांच्या मेकअपमुळे. अशीच वेळ बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मलायकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. तिने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा थांबत नाही तोच पुन्हा एकदा तिला ट्रोल व्हावं लागलं. यावेळी मात्र तिने केलेल्या मेकअपमुळे तिला ट्रोल व्हालं लागलं आहे.

फॅशन स्टेटमेंटमुळे सतत चर्चेत येणारी मलायका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते. त्यामुळेच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम नवनवीन फोटो शेअरही करत असतं. या फोटो शेअर करण्याच्याच भानगडीमध्ये तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. मलायकाने अलिकडेच तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने केलेला मेकअप चाहत्यांना फारसा रुचलेला दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘हा मेकअप आहे की काय’? असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘तू चेहऱ्यावर मेकअप केला आहेस, की मेकअपवर तू आहेस’? असा खोचक सवालही काहींनी विचारला आहे. इतकंच नाही तर ‘मेकअप केल्यामुळे वय लपत नाही’, असंही काहींनी म्हटलं आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच कशाला अर्जुन कपूरसोबतचं नात्यावर असो किंवा बोल्ड फोटोशूटवरुन असो मलायका कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 9:33 am

Web Title: internet stands divided over malaika aroras make up in her latest post ssj 93
Next Stories
1 सावित्री-जोतिरावांच्या चरित्रावर मालिका
2 लिखाणातून प्रेक्षकांना रंगभूमीकडे वळवा
3 पाच वर्षे फक्त नाटक
Just Now!
X