करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण आता केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृहे सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटगृहे उघडताच ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी देशात असलेल्या निवडणूकांमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. म्हणून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र लोक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून हा सर्वोत्तम निर्णय असल्याचे म्हणत अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

१) या माणसाची दूरदृष्टी…

२) तेव्हाही रिकामीच होती चित्रपटगृह आणि आताही

३) ही तर दुसरी लाट

४) हाच मार्ग

५) दुसरं संकट

६) ठोस आणि गंभीर निर्णय

७) विवेकच वाचवेल अनेक जीव

८) म्हणून करत असतील

कोण कोण आहे या चित्रपटामध्ये?

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.