05 March 2021

News Flash

‘आयपीएल’मध्ये ठुमके लावणाऱ्या अॅमीवर टीका

डान्स प्रशिक्षक त्यांची अकॅडमी कायमची बंद करून काशीला जातील

आयपीएलच्या उदघाटन समारंभात लाल आणि सोनेरी रंगाच्या पेहरावातील अॅमीचे जोरदार आतिषबाजीत स्वागत झाले.

क्रिकेट आणि बॉलिवूड ही दोन्ही क्षेत्र आज एकमेकांशी काहीनाकाही कारणांनी जोडली गेलेली आहेत. क्रिकेटर्सच्या कार्यक्रमांना बॉलिवूडकरांचा समावेश असल्याचे पाहायला मिळते. तसेच, बॉलिवूडकरांच्या कार्यक्रमातही क्रिकेटर्सची उपस्थिती अनेकदा दिसते. महत्त्वाच्या अशा इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वाला कालपासून सुरुवात झाली. यावेळी हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन हिने ठुमके लावत आयपीएलच्या नव्या पर्वाची शानदार सुरुवात केली. मात्र, अॅमीचा हा परफॉर्मन्स अनेक नेटिझन्सना आवडला नसल्याचे दिसते.

आयपीएलच्या उदघाटन समारंभात लाल आणि सोनेरी रंगाच्या पेहरावातील अॅमीचे जोरदार आतिषबाजीत स्वागत झाले. त्यानंतर तिने’ काला चष्मा’ आणि ‘ओम शांती ओम’ या गाण्यांवर डान्स केला. मात्र, कट्टर क्रिकेटप्रेमींना तिचा हा डान्स फार काही भावला नाही. अॅमी सध्या ट्रेण्डमध्ये आली असून तिने अतिशय वाईट डान्स केल्याची टीका तिच्यावर केली जातेय. अॅमीचा डान्स फारच वाईट होता. ‘२८ डान्स प्रशिक्षक त्यांची अकॅडमी कायमची बंद करून काशीला जातील,’ असे एका नेटिझनने म्हटले असून, एकाने तर चक्क तिच्यापेक्षा सनी देओल चांगला डान्स करतो असे म्हटलेय.

नेटिझन्सनी केलेले ट्विट्स

Next Stories
1 माझा किताबखाना : विचारांना कलाटणी देणारं ‘द माँक व्हू सोल्ड हीज फेरारी’
2 ‘असं, कोणी सोडून जातं का भाऊ?’
3 नामवंतांचे बुकशेल्फ : अंतर्मनात डोकावण्याची दृष्टी लाभली
Just Now!
X