25 November 2020

News Flash

अन् रणवीर सिंग पोलार्डला म्हणाला राक्षस

कायरान पोलार्डने कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने ३१ चेंडूत दहा षटकारांसह ८३ धावांची स्फोटक खेळी केली. 

लागोपाठ विकेट पडत असताना कर्णधार पोलार्डने अल्जारी सोजेफसह(नाबाद १५) ३.४ षटकांत ५४ धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. पोलार्डच्या दमदार खेळीच्या जोरावर रोमांचक सामन्यात मुंबईनं पंजाबचा तीन विकेटनं पराभव केला. मुंबईच्या विजयात पोलार्डनं महत्वाची भूमिका बजावली. पोलार्डच्या या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगनं पोलार्डच्या खेळीचे कौतुक केले आहे. पोलार्डचा उल्लेख त्यानं चक्क राक्षस असा केला आहे. पोलार्डने लागावलेले दहा षटकांर पाहून रणवीर प्रभावित झाला आहे.

रणवीर सध्या १९८३ विश्वचषकावरील आधारीत चित्रपटात कपील देव यांची भूमिका करत आहे. त्यामुळे सध्या तो क्रिकेट जवळून अनुभवतोय. मुंबई-पंजाब यांच्यातील सामन्यानंतर रात्री उशीरा रणवीरनं ट्विट करत पोलार्डची फिरकी घेतली.

काय आहे रणवीर सिंगचे ट्विट –
‘पोलार्ड (Kieron Pollard) एक राक्षस आहे! जबरदस्त फलंदाजी !!! भन्नाट आत्मविश्वास !!! सर्वश्रेष्ठ मध्ये सर्वोत्तम!!! शानदार कर्णधार – प्रेरणादायी आणि स्वत: समोर येऊन नेतृत्व !!! प्रतिभाशाली पोलार्ड

वानखेडे मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा तीन विकेटनं पराभव केला. कायरान पोलार्डने कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने ३१ चेंडूत दहा षटकारांसह ८३ धावांची स्फोटक खेळी केली. पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. पंजाबचं 198 धावांचं आव्हान मुंबईने कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या इतर फलंदाजांनी चांगलीच निराशा केली, मात्र कायरन पोलार्डने एक बाजू लावून धरत कर्णधाराला साजेशी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:22 pm

Web Title: ipl 2019 mi vs kxip kieron pollard powers mumbai indians to victory ranveer singh said monster
टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : विस्फोटक खेळीनंतर पोलार्डचं पत्नीला वाढदिवसाचे भन्नाट गिफ्ट
2 महिला कार रॅली : दीपा, प्रियांका यांना विजेतेपद
3 राजस्थानची चेन्नईसमोर अग्निपरीक्षा!
Just Now!
X