03 March 2021

News Flash

एकीकडे अरबाजची कबुली तर दुसरीकडे मुन्नी होतेय बदनाम

मलायका अरोराला अशा प्रकारे मजा- मस्ती करताना पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत

ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे कसं जावं हे कोणाला शिकायचं असेल तर ते मलाइका अरोराकडून शिकावे. एकीकडे तिचा पुर्वाश्रमिचा पती अरबाज खान बेटिंगच्या प्रकरणात अडकला असताना मलायका मात्र पार्ट्यांमध्येच व्यग्र आहे. सध्या तिचा वीरे दी वेडिंगच्या टीमसोबत पार्टी करताना पाहण्यात आले. या पार्टीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये ती करिना कपूर आणि अमृता अरोरासोबत नाचताना दिसत आहे.

करिना आणि अमृतासोबत मलायका मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्या तिघी वीरे दी वेडिंग सिनेमा प्रदर्शित झाल्याची पार्टी साजरी करत होते. ही पार्टी रिया कपूरचा कथित प्रियकर करण बूलानीने आयोजित केली होती. मलायका अरोराला अशा प्रकारे मजा- मस्ती करताना पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘मलायका आणि करिना यासाठी पार्टी करत आहेत कारण अरबाज खानला पोलिसांनी समन्स पाठवला आहे.’

आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याची कबुली बॉलिवूड अभिनेता-निर्माता अरबाज खानने दिली आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याचे अरबाजने तपास अधिकाऱ्यांसमोर कबूल केले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी शुक्रवारी सकाळी अरबाज खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी समन्स पाठवण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी शनिवारी सकाळी अरबाजला चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला बुकी सोनू जालान आणि अरबाजला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. अरबाज आणि सोनू जालान मागच्या पाच वर्षांपासून परस्परांना ओळखत होते.

दोन दिवसापूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. सोनू जालान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे म्हटले जाते. सट्टेबाजीमध्ये अरबाजला २.८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे टाइम्स नाऊने म्हटले आहे. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 3:10 pm

Web Title: ipl betting arbaaz khan questioned while ex wife malaika arora parties with kareena kapoor
Next Stories
1 ही आहेत ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट पाहण्यामागची पाच कारणं
2 Box Office Collection: ‘वीरे दी वेडिंग’ने एका दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई
3 ….म्हणून ‘वीरे दी वेडिंग’ एकदा पाहाच!
Just Now!
X