News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण: मुंबई महापालिकेनं पाटणा पोलीस महानिरीक्षकांची मागणी फेटाळली

सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं आहे. या प्रकरणी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीएमसीने हा अगदीच दुदैवी निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली

अवश्य पाहा – राम मंदिर आणि भाजपाचा अजब योगायोग; शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलं ते दुर्मिळ नाणं

“पाटणाच्या आयजींनी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं होतं. या पत्रातील मागणीला बीएमसी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलं आहे. विनय तिवारी आता १४ दिवस सक्तीच्या क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. बीएमसीने घेतलेला हा दुर्दैवी निर्णय आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन गुप्तेश्वर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे. २४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रेहा चक्रवर्तीचे नाव घेतले. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह ५६ जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:56 pm

Web Title: ips gupteshwar pandey comment on patna vs mumbai police mppg 94
Next Stories
1 Video : अनिल कपूर यांचा आलिशान बंगला पाहा आतून
2 डॉक्टर डॉन मालिकेत येणार नवे वळण
3 सुशांत मृत्यू प्रकरण: “बिहार पोलिसांना मी स्वत:चं ऑफिस द्यायला तयार”; संगीतकाराची ऑफर
Just Now!
X