26 February 2021

News Flash

Photo : हॉट फोटोशूट करणाऱ्या ‘या’ स्टार कीडला ओळखलंत का?

ही स्टार कीड अनेक वेळा तिच्या फोटोंजमुळे चर्चेत असते

सैफ अली खान, श्रीदेवी या लोकप्रिय कलाकारांच्या मुलांनी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सुरुवात केली आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट, वरुण धवन हे काही स्टार कीड लोकप्रिय होत आहेत. मात्र काही स्टार कीड असे आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसतांनाही त्यांची लोकप्रियता कमालीची आहे. यामध्येच तैमुर, अबराम आणि इरा खान यांची लोकप्रियताही प्रचंड आहे. आमिर खानची लेक इरा अनेक वेळा तिच्या पर्सनल लाइफ आणि फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. यावेळीदेखील ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

इरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून कायम ती इन्स्टावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून अनेक वेळा ती कलाविश्वामध्ये पदार्पण करणार का असा प्रश्नही चाहत्यांमध्ये उपस्थित होतो. मात्र इराला निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावायचं असल्याचं तिने ठरवलं आहे. यासाठी ती तयारीही करत आहे. या साऱ्यातून ती वेळ काढून तिच्या लूककडेही तितकंच लक्ष देत असते. त्यामुळेच सध्या तिने केलेल्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan Official Fan Club (@ira.khan_) on

इराने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट केलं आहे. दरम्यान, इरा आमिर खान प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या शोज आणि इतर कामांमध्ये कायम व्यस्त व्यस्त असते. सध्या तिचं वडिलांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण सुरू आहे. इरा आमिर खानची लेक असूनदेखील कधीही ती याचा देखावा करत नाही. ती कायमच तिच्या सहकाऱ्यांसोबत प्रेमाने वागते. तसंच तिच्यात जराही अहंकार नसल्याचं तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 11:14 am

Web Title: ira khan aamir khan daughter hot photo shooot ssj 93
Next Stories
1 जबरा फॅन! चाहतीमुळे शाहरुखला मिळाली चंद्रावर जमीन
2 हॉलिवूड चित्रपटातील ‘तो’ सीन ब्लर केल्यामुळे फरहान अख्तरची आगपाखड
3 शतक महोत्सवी नाट्य संमेलनालाही राष्ट्रपती राजवटीचा फटका?
Just Now!
X