17 September 2019

News Flash

आमिर खानच्या लेकीने ‘या’ क्षेत्रात निवडली करिअरची वाट

इरा आपल्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये डेब्यु करेल अशी चर्चा होती

इरा खान

बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांच्या मुलांचं कलाविश्वामध्ये पदार्पण झालं आहे. सैफ अली खान, चंकी पांडे, डेव्हिड धवन, महेश भट्ट यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमीर खान यांची मुलगी इरा खानदेखील कलाविश्वामध्ये पदार्पण करेल अशी चर्चा होती. मात्र इराने कलाविश्व सोडून अन्य एका क्षेत्राची करिअर म्हणून निवड केल्याचं पाहायला मिळत आहे.

लाईमलाईटपासून दूर राहणारी इरा तिच्या वैयक्तिक कारणामुळे अनेक वेळा चर्चेत येत असते. मात्र यावेळी तिच्या करिअरची चर्चा रंगू लागली आहे. इरा आपल्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये डेब्यु करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र इराने या क्षेत्रामध्येच राहून एक नवी वाट निवडली आहे. इरा दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

इरा लवकरच ‘यूरिपाइड्स मेडिया’ या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘यूरिपाइड्स मेडिया’ हे ग्रीक ट्रॅजडी असलेलं नाटक असून भारतातील काही मुख्य शहरांमध्ये त्याचे प्रयोग होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, इराने या नाटकाचं दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

“मी थिएटरकडे वळले यामध्ये फार असा मोठा निर्णय घेतल्यासारखं नाही. मला नाटक आवडतं, नाटक एक जादू आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही त्याने त्याचं स्थान कायम टिकवून ठेवलं आहे. हे खरं वास्तव आहे”, असं इरा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “पडद्यावर झळकण्यापेक्षा पडद्यामागे राहून काम करणं मला आवडतं. मला कधीही अभिनय करावा असं वाटलं नाही.कॉलेजजीवनात असतानादेखील मी कायम नाटकांचं वैगरे वाचन करायचे”. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून इरा तिच्या कथित प्रियकरामुळे चर्चेत आली होती. इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये इरा आणि मिशाल एकत्र वेळ घालवताना दिसत होते.

First Published on August 23, 2019 6:13 pm

Web Title: ira khan daughter of aamir khan is set to make her directorial debut ssj 93